महाराष्ट्राने काँग्रेसचा प्रकोप आणि त्यांची पापे दीर्घकाळ सहन केली आहेत. विशेषतः मराठवाड्याने. आपल्या समस्यांचे मूळ काँग्रेस आहे. काँग्रेसने येथील शेतकऱ्यांच्या सुख-दुःखाची परवा केली नाही. मराठवाड्यात 11 सिंचन योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. या भागातील सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी योजना सुरूही करण्यात आल्या होत्या. मात्र महाविकास आघाडी सरकारने त्या थांबवल्या. यानंतर महायुतीच्या सरकारने या योजनांना गती दिली आहे.
मोदी म्हणाले, शेतकऱ्यांचे हीत हे आमच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे. महाराष्ट्रातील १.२५ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान निधीचा लाभ मिळाला आहे. मराठवाड्यात गेल्या अडीच वर्षांत हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. समृद्धी महामार्गाने या परिसराच्या प्रगतीला नवा मार्ग मिळाला आहे. नांदेडहून दिल्ली आणि आदमपूरला विमानसेवा सुरू झाली आहे. लवकरच आपल्या शीख बांधवांना येथून अमृतसरला विमानाने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.
पंतप्रधान पुढे म्हणाले, स्वयंपाक घरात पहिल्यांदा गॅस सिलिंडरवर भोजन बनत आहे. घरातील महिला सदस्यांना फायदा होत आहे. तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याचे आमचे स्वप्न आहे.
मोदी पुढे म्हणाले, यांनी (काँग्रेस) तर हदच केली. काँग्रेसने फसवणुकीच्या बाबतीत आपलाच रेकॉर्ड मोडला आहे. काँग्रेसचे लोक संविधानाच्या नावाने आपलेच लाल पुस्तक वाटत आहेत. काँग्रेसच्या लाक पुस्तकावर भारताचे संविधान असे लिहिले आहे. मात्र, उघडून बघितल्यावर समोर आले की, ते तर कोरेच आहे. त्यात बाबासाहेबांच्या संविधानाचा एक शब्दही लिहिलेला नाही. हे पाहून संपूर्ण देश चकित आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीच्या समर्थनार्थ एक लाट सुरू आहे. आज प्रत्येकाच्या तोंडी अकच घोषणा आहे, भाजपा - महायुती आहे... महाराष्ट्रची प्रगति आहे.
आज देश विकसित भारताचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून पुढे जात आहे. यासाठी भारप आणि त्यांचे मित्र पक्षच काम करत आहेत, हे जनता ओळखून आहे. यामुळेच ते भाजप आणि एनडीए सरकारांना निवडून देत आहे. देशातील जनतेने तिसऱ्यांदा एनडीएला संधी दिली आहे. मात्र त्यात नांदेडचे फून नव्हते, असेही मोदी म्हणाले.