Maharashtra Assembly Speaker Election: "राहुल नार्वेकर कोणत्याही पक्षात गेले तर…" , सभागृहात अजित पवारांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 02:40 PM2022-07-03T14:40:24+5:302022-07-03T14:40:41+5:30

Maharashtra Assembly Speaker Election: अजित पवार यांनी विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत बोलताना जोरदार टोलेबाजी केली.

Maharashtra Assembly Speaker Election | Ajit Pawar comment on Rahul Narvekar in assembly session | Maharashtra Assembly Speaker Election: "राहुल नार्वेकर कोणत्याही पक्षात गेले तर…" , सभागृहात अजित पवारांचा टोला

Maharashtra Assembly Speaker Election: "राहुल नार्वेकर कोणत्याही पक्षात गेले तर…" , सभागृहात अजित पवारांचा टोला

googlenewsNext

मुंबई: आज महाराष्ट्राच्या विधिमंडळात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यात भाजपचे राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रस्तावाच्या बाजूने 164 तर प्रस्तावाच्या विरोधात 107 जणांनी मतदान केले. दरम्यान, या निवडीनंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी नार्वेकरांवर जोरदार टोलेबाजी केली.

'नार्वेकर नेतृत्वाच्या जवळ जातात'
अजित पवार पुढे म्हणतात की, ''मला एका गोष्टीचे कौतुक आहे, राहुल नार्वेकर कुठल्याही पक्षात गेले तर पक्षनेतृत्वाच्या जवळ जातात. शिवसेनेत असताना त्यांनी आदित्य ठाकरेंना आपलंसं केलं. राष्ट्रवादीत आल्यावर त्यांनी मला आपलंसं केलं. आता भाजपात गेल्यावर देवेंद्र फडणवीसांना आपलंसं करून टाकलं. आता एकनाथ शिंदेंनी राहुल नार्वेकरांना आपलंसं करून घ्यावं, नाहीतर त्यांचं काही खरं नाही,'' असं अजित पवार म्हणताच सभागृहात हशा पिकला.

'मोदी लाटेत नार्वेकरांचा पराभव'
पवार पुढे म्हणाले की, ''राहुल नार्वेकर आधी शिवसेनेत होते, त्यावेळी ते आदित्य ठाकरेंचे जवळचे सहकारी म्हणून काम करायचे, असे मी ऐकले होते. त्यांनी आदित्य ठाकरेंना कायद्याचे बरंच ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. आम्हीही अशा लोकांवर लक्ष ठेवून असतो. त्यामुळे मला मावळ लोकसभा मतदारसंघात अभ्यासू व सुशिक्षित उमेदवार पाहिजे होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी राहुल नार्वेकर यांना विनंती केली आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार झाले. दुर्दैवाने नरेंद्र मोदी यांची लाट असल्याने पराभूत झाले,'' असंही अजित पवार म्हणाले.

'अध्यक्ष म्हणून उत्तम काम करतील'
पवार पुढे म्हणाले, ''राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेचे सदस्यपद मिळाले. तेथे त्यांनी उत्तम काम केले. त्यांनी शिवसेनेचे प्रवक्ते म्हणूनही उत्तम काम केले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणूनही उत्तम काम केले. आता ते विधानसभा अध्यक्ष म्हणूनही उत्तम काम करतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.''

Web Title: Maharashtra Assembly Speaker Election | Ajit Pawar comment on Rahul Narvekar in assembly session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.