Maharashtra Assembly Speaker Election Live: शिवसेनेच्या त्या १६ आमदारांवर कधीही कारवाई- प्रसाद लाड

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 07:50 AM2022-07-03T07:50:23+5:302022-07-03T15:32:09+5:30

Maharashtra Assembly Speaker Election Live: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज होत आहे. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या राजन ...

Maharashtra Assembly Speaker Election result Live updates in marathi bjp rahul narvekar shiv sena rajan salvi | Maharashtra Assembly Speaker Election Live: शिवसेनेच्या त्या १६ आमदारांवर कधीही कारवाई- प्रसाद लाड

Maharashtra Assembly Speaker Election Live: शिवसेनेच्या त्या १६ आमदारांवर कधीही कारवाई- प्रसाद लाड

googlenewsNext

Maharashtra Assembly Speaker Election Live: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज होत आहे. भाजपाकडूनराहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या राजन साळवी हे दोन उमेदवार अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक देखील विधान  परिषद आणि राज्यसभेप्रमाणे चुरशीची ठरणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच सर्वांनी मतदान करावं, असा आदेश आमदारांना देण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार सुनील प्रभू यांचा व्हीप पाळणार का? याबाबत शंका निर्माण झाली आहे. तसेच ठाकरे समर्थक आमदार आणि शिंदे समर्थक आमदार यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

विधान सभेत ठाकरे समर्थक आमदार आणि शिंदे समर्थक आमदारांत संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार सुनील प्रभू यांचा व्हीप पाळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

LIVE

Get Latest Updates

03:36 PM

अमरावतीत मुख्यमंत्र्यांचे बॅनर फाडले

03:23 PM

शिवसेनेच्या त्या १६ आमदारांवर कधीही कारवाई- प्रसाद लाड

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटातील १६ आमदारांवर कधीही कारवाई होऊ शकते, असं भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी सांगितलं. नव्या विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेचे विधीमंडळाचे प्रतोद भरत गोगावले यांनी पक्षाच्या व्हिप विरोधात मतदान केलेल्या आमदारांची दखल घेण्याबाबतचं पत्र स्वीकारलं आहे. त्यामुळे १६ आमदारांवर केव्हाही कारवाई होऊ शकते, असं प्रसाद लाड म्हणाले.

03:15 PM

विधानसभेच्या परिसरात नव्या विधानसभा अध्यक्षांसोबत फोटो सेशन

विधानसभेतील नवे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. 

01:40 PM

आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

फडणवीसांना अडीच वर्षाआधीच सांगितलेलं आणि तेव्हा ऐकलं असतं तर आताची परिस्थिती तेव्हा दिसली असती. पुढे अडीच वर्ष फडणवीस मुख्यमंत्री असते- आदित्य ठाकरे

01:38 PM

परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन पाळलं जाईल अशी आशा- आदित्य ठाकरे

"बच्चन साहेबांच्या ओळीत सांगायचं झालं तर परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन यांचं पालन तुम्ही कराल अशी आशा आहे", असं आदित्य ठाकरेंनी राहुल नार्वेकरांबाबत बोलताना म्हटलंय.

01:36 PM

सुनील प्रभूंनी मांडला अभिनंदाचा प्रस्ताव

"तरुण अध्यक्ष म्हणून गौरव आहेच. पण कायदा समजून सांगण्याचा प्रयत्न तुमचा असतो त्यामुळे तुम्ही कायदेमंत्री व्हाल असं वाटलं होतं. पण दुर्दैव आहे. नशिबाचे फेरे कधीही फिरू शकतात. नियती कुणावरही कधीही आघात करू शकतो. ज्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहात होतो त्यांना उपमुख्यमंत्री पाहातोय. कायदामंत्री म्हणून पाहात होतो त्यांना विधानसभा अध्यक्ष म्हणून पाहातोय", असं सुनील प्रभू म्हणाले.

01:31 PM

'मला एक मेसेज आलाय'; छगन भुजबळ सभागृहात मध्येच उठले, नेमकं काय घडलं पाहा!

01:31 PM

झेंडा सोडून अजेंडा हाती घ्यायला हवा- बच्चू कडू

विकासासाठी झेंडा सोडून अजेंडा हाती घ्यावी लागेल. अपक्ष, छोट्या पक्षांना त्यांचा मुद्दा बोलण्याची संधी मिळाली पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले.

01:05 PM

"आता हे नवं सरकार कसं आलं काय आलं यात मी जात नाही. पण एकनाथराव तुम्ही मला जरी एकदा कानात सांगितलं असतं की उद्धव ठाकरेंशी बोला आणि अडीच वर्ष झालीत मला मुख्यमंत्री करा तर मी नक्कीच त्यांच्याशी बोललो असतो. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता", असं अजित पवार म्हणाले.

01:04 PM

चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजनांवर अजित पवारांची फटकेबाजी

एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदासाठी नाव फडणवीसांनी जाहीर केल्याच्या पत्रकार परिषदेचा उल्लेख करत अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. "फडणवीसांनी शिंदेंची मुख्यमंत्रीपदाची घोषणा करताना भाजपाची लोक इतकी रडायला लागली की गिरीश महाजन तर फेटा सोडून डोळ्यालाच लावतो की काय असं झालं होतं. सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. कुणी काहीही म्हटलं तरी सगळ्यांचा मनात धाकधूक आहेच. चंद्रकांतदादा तुम्ही तर बाक वाजवूच नका. कारण तुम्हाला मंत्रीपद मिळेल की नाही याची काही शाश्वती नाहीय", असं अजित पवार म्हणाले आणि विधानभवनात एकच हशा पिकला.

12:27 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचा अभिनंदनाचा प्रस्ताव

विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. यावेळी भाषणात फडणवीसांनी नार्वेकरांच्या आजवरच्या कामाची आणि योगदानाची माहिती तर दिलीच. पण यासोबत फडणवीसांनी जावई आणि सासऱ्याचं वर्चस्व विधीमंडळात राहणार असल्याचं नमूद केलं. यावेळी ज्येष्ठ लेखक, कवी पु.ल.देशपांडे यांच्या एका वाक्याचा दाखला फडणवीसांना दिला. 

"राहुल नार्वेकर देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. तसंच इतिहासात पहिल्यांदाच वरच्या सभागृहात सासरे सभापती आणि विधानसभेच्या अध्यक्षपदी जावई असा योगायोग जुळून आला आहे. पु.ल.देशपांडे म्हणायचे जावई आणि सासऱ्याचं कधी पटत नाही. पण तसं इथं होणार नाही. याची आम्हाला खात्री आहे", असं फडणवीस म्हणाले.

12:19 PM

देवेंद्र फडणवीसांनी मोठंपण दाखवलं- एकनाथ शिंदे

भाजपाकडे ११६ आमदार होते आणि आमच्याकडे ५० तरी फडणवीसांनी मोठेपणा दाखवला. मला मुख्यमंत्रीपद दिलं- एकनाथ शिंदे.

12:18 PM

मुख्यमंत्री शिंदेंकडून अभिनंदनाचा प्रस्ताव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी राहुल नार्वेकरांनी आजवर केलेल्या कामांचा दाखला दिला.

11:59 AM

भाजपाचे राहुल नार्वेकर जिंकले

विधानसभा अध्यक्षपदी भाजपा आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर १६४ मतांसह विजयी झाले आहेत.

11:56 AM

शिवसेनेच्या राजन साळवी यांना १०७ मतं

महाविकास आघाडीकडून शिवसेना उमेदवार राजन साळवी यांना एकूण १०७ मतं पडली आहेत.

11:51 AM

रोहित पवारही चुकले

विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपा आणि शिवसेनेचे उमेदवार रिंगणात असून आमदारांच्या शिरगणतीद्वारे मतमोजणी केली जात आहे. यावेळी आमदारांना आपलं नाव सांगून मतमोजणीचा आकडाही सांगावा लागत आहे. यात अनेक आमदारांची गणती चुकत असल्याचं दिसून येत आहे. अनेक आमदारांनी आपला मतमोजणी आकडा सांगताना गल्लत केली. यात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार देखील चुकले. पण चूक लक्षात येताच वेळीच सावरुन घेत योग्य क्रमांक रोहित पवार यांनी म्हटला. 

11:44 AM

मनसेचं मत भाजपाला

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान केलं.

11:43 AM

भाजपाच्या राहुल नार्वेकरांनी बहुमत गाठलं

विधानसभा अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत भाजपाच्या राहुल नार्वेकर यांना एकूण १६४ मतं पडली आहेत.

11:38 AM

हितेंद्र ठाकूर शिंदे-भाजपासोबत

बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्यासह तीन आमदारांनी भाजपाच्या राहुल नार्वेकर यांना मतदान केलं.

11:30 AM

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिरगणतीला सुरुवात

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आमदारांच्या शिरगणतीला सुरुवात झाली आहे.

11:23 AM

अजित पवार, छगन भुजबळ कोरोना मुक्त

अजित पवार आणि छगन भुजबळ कोरोनामुक्त झाले असून विधानसभा अधिवेशनासाठी उपस्थित आहेत.

11:09 AM

शिंदे समर्थक आमदारांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन

विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी शिंदे समर्थक गटानं विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं

11:03 AM

विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात

शिंदे गटाचे आमदार आणि भाजपा आमदारांची आसनव्यवस्था सत्ताधारी बाजूला.

10:26 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह विधानभवनात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह विधानभवनात पोहोचले आहेत. 

10:24 AM

आदित्य ठाकरे 'मातोश्री'वरुन विधानभवनाकडे रवाना

शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी विधान भवनाच्या दिशेने रवाना झाले आहेत.

10:22 AM

शिंदे गट विधानभवनाकडे रवाना

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिंदे गट हॉटेल ट्रायडेंटकडून विधानभवनाच्या दिशेने रवाना झाले आहेत. याआधी कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला सर्व आमदारांनी अभिवादन केलं.

09:57 AM

तुमचं राज्य कसं आलं ते देशानं पाहिलं आहे. तरीही आम्ही तुम्हाला राज्य चालवण्यासाठी शुभेच्छा देतो. शिवसेनेच्या पाठीत अनेकांनी वार केले. पण भविष्यात हिच शिवसेना राज्यावर राज्य करेल हे लक्षात ठेवा- संजय राऊत

09:55 AM

बाळासाहेब ठाकरे हे नाव आग आहे, आगीशी खेळू नका- संजय राऊत

बाळासाहेब ठाकरे हे नाव आग आहे.  आगीशी खेळू नका, हात पोळतील. राज्याची जनता या सरकारला स्वीकारणार नाही- संजय राऊत

09:24 AM

शिंदे गटाकून व्हिप जारी

आजपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू होणार असून पहिल्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी सरकारच्या वतीने ऍड. राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली असून, या निवडणुकीत त्यांनाच मत देण्यासाठी शिवसेना पक्षाने आपले सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांना व्हीप बजावला आहे. हा व्हीप पक्षाच्या उर्वरित 16 आमदाराना देखील लागू असेल. व्हीपची प्रत ह्या सन्माननीय आमदार महोदयांना देखील पाठवण्यात आलेली आहे.

08:57 AM

बहुमत चाचणीवेळी अध्यक्षांची भूमिका महत्वाची 

विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवाराची घोषणा झालेली नव्हती. शेवटी तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी चर्चा करुन राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. नवनियुक्त शिंदे सरकारची बहुमत चाचणी दोन दिवसाच्या अधिवेशनात होणार आहे. त्याआधी आज विधानसभा अध्यक्षांची निवड होत आहे. शिंदे गट आणि भाजपच्या बहुमत चाचणीवेळी अध्यक्षांची भूमिका महत्वाची असणार आहे. 

08:55 AM

राजन साळवी यांचाच विजय होणार- बाळासाहेब थोरात

शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांचाच विजय होणार असून महाविकास आघाडी पूर्णपणे साळवी यांच्या पाठिशी असल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.

08:05 AM

व्हिप कोणाचा? अध्यक्ष कोण?; विधानसभेत शिवसेनेचे शिंदे-ठाकरे गट येणार आमनेसामने

07:56 AM

शिवसेनेचा व्हीप जारी, शिंदे गट पाळणार का?

आज विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. शिवसेनेकडून प्रतोद सुनील प्रभू यांनी एक व्हीप जारी केला आहे. महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी राजन साळवी यांना मतदान करण्याचा व्हीप जारी केला आहे. तर शिंदे गटाकडून प्रतोद भरत गोगावले यांनीही भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान करण्यासाठीचा व्हीप जारी केला आहे. त्यामुळे व्हीपवरुन संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
 

07:54 AM

आज विधानसभा अध्यक्षाची निवडणूक

ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थक यांच्या संघर्ष होण्याची शक्यता. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीनं आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे. भाजपाकडून राहुल नार्वेकर, तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  

Web Title: Maharashtra Assembly Speaker Election result Live updates in marathi bjp rahul narvekar shiv sena rajan salvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.