शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

लाखावर मिळाली मते, तरी राज्यात ५८ जणांचा पराभव; शरद पवारांचे किती उमेदवार, सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यातील..जाणून घ्या

By राजाराम लोंढे | Published: November 25, 2024 1:40 PM

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थाेरात, सुनील टिंगरे, संग्राम थोपटे, धीरज देशमुख, राम शिंदे आदींचा समावेश

राजाराम लोंढेकोल्हापूर : विधानसभेची निवडणूक एकतर्फी झाली असली तरी अनेक मतदारसंघात काटाजोड लढती पाहावयास मिळाल्या. राज्यातील ५८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांच्या विरोधात लाखापेक्षा अधिक मते घेऊनही ५८ जणांना गुलालापासून वंचित राहावे लागले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थाेरात, सुनील टिंगरे, संग्राम थोपटे, धीरज देशमुख, राम शिंदे आदींचा समावेश आहे. अशा पराभूत उमेदवारांची संख्या पुणे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अधिक आहे.

शरद पवार यांच्या २२ उमेदवारांचा समावेशराज्यातील लाखापेक्षा अधिक मते घेऊन पराभूत झालेल्या ५८ पैकी तब्बल २२ उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आहेत. त्यापाठोपाठ १६ उमेदवार काँग्रेसचे आहेत.

लाखभर मते घेऊनही पराभव झालेले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष : (२२) - सुभाष पवार (मुरबाड, ठाणे), सचिन दोडके (खडकवासला), प्रशांत जगताप (हडपसर), देवदत्त निकम (आंबेगाव), अशोक पवार (शिरूर), रमेश अप्पा थोरात (दौंड), राहुल कलाटे (चिंचवड), समरजीत घाटगे (कागल), मानसिंगराव नाईक (शिराळा), प्रभाकर घार्गे (माण), शशिकांत शिंदे (कोरेगाव), दीपक चव्हाण (फलटण), दिलीप खोडपे (जामनेर), माणिकराव शिंदे (येवला), राणी लंके (पारनेर), संदीप वर्पे (कोपरगाव), प्राजक्त तनपुरे (राहुरी), सतीश चव्हाण (गंगापूर), चंद्रकांत दानवे (भोकरदन), राहुल मोटे (परांडा), विजय भांबरे (जिंतूर), पृथ्वीराज साठे (केज)

काँग्रेस - (१६) - पृथ्वीराज चव्हाण (कराड), संजय जगताप (पुरंदर), संग्राम थोपटे (भोर), ऋतुराज पाटील (कोल्हापूर दक्षिण), राहुल पाटील (करवीर), भगीरथ भालके (पंढरपूर), कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), बाळासाहेब थोरात (संगमनेर), विलास औताडे (फुलंब्री), धीरज देशमुख (लातूर ग्रामीण), माणिकराव ठाकरे (दिग्रस), राहुल बोंद्रे (चिखली), गिरीश पांडव (नागपूर दक्षिण), सुरेश भोयर (कामठी), सतीश वारजूरकर (चिमूर), मनोहर पोरेटी (गडचिरोली).

उद्धवसेना - (७) - के. पी. पाटील (राधानगरी), सत्यजीत पाटील (शाहूवाडी), राजू शिंदे (औरंगाबाद पश्चिम), सुरेश बनकर (सिल्लाेड), दत्ता गोर्डे (पैठण), विशाल कदम (गंगाखेड), डॉ. सिद्धार्थ देवळे (वाशीम).

भाजप - (४)- राम सातपुते (माळशिरस), राम शिंदे (कर्जत-जामखेड), अर्चना पाटील (लातूर शहर), मदन येरावार (यवतमाळ), संग्रामसिंह देशमुख (कडेगाव पलूस).

राष्ट्रवादी काँग्रेस - (२) - सुनील टिंगरे (वडगाव शेरी), संजयकाका पाटील (तासगाव)

शिंदेसेना -(१) - राजेंद्र राऊत (बार्शी)

इतर पक्ष, अपक्ष - (७) : संदीप पाचगे (मनसे-ठाणे), क्षितिज ठाकूर (बविआ-नालासोपारा), बाळाराम पाटील (शेकाप-पनवेल), रणजीतसिंह शिंदे (अपक्ष-माढा), असीफ रशीद (भासेपा-मालेगाव), जे. पी. गावीत (माकप-कळवण), गणेश निंबाळकर (प्रहार-चांदवड).

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024