Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रचारसभांना सुरुवात झाली आहे, दोन्ही आघाडीकडून सोशल मीडियावरही कॅम्पेन जोरदार सुरु आहे. महाविकास आघाडीने काल 'लाडक्या बहिणींसाठी आणली यांनी बाधा..',या नावचा एक कॅम्पेन व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
"अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर स्वतःची घरं भरली अन् पक्ष संकटात असताना भाजपात गेले"
राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये जाहिरातीमधील मजूकर आणि अजित पवारांच्या पात्राचा उल्लेख करत तक्रार दाखल केली आहे. या जाहिरातीमधून अजित पवार यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला असल्याचे तक्रारीमध्ये केला आहे. बदनामीकारण मजकूर, खोट वृत्त आणि वादग्रस्त आशयाची व्हिडिओ जाहिरात बनवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिमा मलिन केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, तक्रारीची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सुरज चव्हाण यांनी पत्रातून केली आहे.
महाविकास आघाडीने गेल्या काही दिवसापासून विधानसभा निवडणुकीसाठी व्हिडीओ कॅम्पेन सुरु केले आहे. काल एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या जाहिरातीमध्ये एक महिला दीड हजारांचा दादा तुमचा वाद फसवा असल्याचं ती महिला बोलत असल्याचे दिसत आहे.ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
महायुतीमध्ये नवाब मलिक यांच्या उमेदवारीला मोठा विरोध करण्यात आला होता. पण भाजपाचा विरोध झुगारत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवाब मलिक यांना उमेदवारी दिली. यानंतर भाजपाने मलिक यांचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले, नवाब मलिक यांच्या प्रचाराला अजित पवार उपस्थित राहणार का नाहीत, या चर्चा सुरू होत्या. तर दुसरीकडे नवाब मलिक यांच्या रोड शो साठी स्वत: अजित पवार यांची उपस्थिती आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनी आम्ही नवाब मलिक यांच्या पाठिमागे खंबीर असल्याचे सांगितले आहे.