अमित ठाकरेंनी लढण्याचा निर्णय दिल्लीतून झाला; संजय राऊतांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 12:28 PM2024-10-28T12:28:43+5:302024-10-28T12:29:21+5:30

Sanjay Raut Speak on MVA, Eknath Shinde, Amit Thackeray: सोलापूर दक्षिण जागेवर काँग्रेस आणि शिवसेनेही उमेदवार दिला आहे असे आम्ही मानतो, टायपिंग मिस्टेक आहे, पण अशा टायपिंग मिस्टेक आमच्याकडून देखील होऊ शकतात - संजय राऊत

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: Amit Thackeray decided to contest from Delhi; Sanjay Raut's claim | अमित ठाकरेंनी लढण्याचा निर्णय दिल्लीतून झाला; संजय राऊतांचा दावा

अमित ठाकरेंनी लढण्याचा निर्णय दिल्लीतून झाला; संजय राऊतांचा दावा

महाविकास आघाडीचा ९०-९० असा काही फॉर्म्युला ठरलेला नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. इतर पक्षांसह तिन्ही पक्षांचे समाधान होईल अशा प्रकारचा फॉर्म्युला आमच्याकडे तयार केला जात आहे. सोलापूर दक्षिण जागेवर काँग्रेस आणि शिवसेनेही उमेदवार दिला आहे असे आम्ही मानतो, टायपिंग मिस्टेक आहे, पण अशा टायपिंग मिस्टेक आमच्याकडून देखील होऊ शकतात, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. 

दिग्रजमध्ये आमचा उमेदवार लढणार नाही. आमच्यात वाद नाही परंतू कन्फ्यूजन झालेय. दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेसने उमेदवार जाहीर केला, मिरजमध्ये देखील काँग्रेसचा उमेदवार देणार असे कानावर आलेले आहे. असे झाले तर महाराष्ट्रभर ही लागण लागेल. महाविकास आघाडी अडचणीत येईल. यामुळे तिन्ही पक्षांनी चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरविले आहे, असे राऊत म्हणाले. 

दक्षिण सोलापूर संदर्भात काँग्रेस पक्षाने उमेदवार जाहीर केला आहे. मिरज मध्ये देखील काँग्रेसचे उमेदवार देण्याचा असं काही माझ्या कानावर आलेला आहे जर असं काही झालं तर संपूर्ण महाराष्ट्रात ही लागण लागेल आणि महाविकास आघाडीत अडचणी होतील म्हणून आम्ही तिघांनी असं ठरवलं आहे तिघांनी एकमेकांशी चर्चा करायची आणि निर्णय घ्यायचा असे ठरविले आहे. विदर्भात काँग्रेस असणे गरजेचे आहे, तसेच मुंबईत शिवसेना असणे गरजेचे आहे, असे राऊत म्हणाले.  

मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्यांना देखील शक्ती प्रदर्शन करावे लागते याचे मला आश्चर्य वाटत आहे. केदार दिघे तिकडे सक्षम आहेत. शिंदे गट शिवसेना म्हणून मिरवत आहे. परंतू ते स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीत. त्यांच्या पक्षाचे निर्णय दिल्लीतून ठरतात. अमित ठाकरेंनी लढावे हा निर्णय देखील दिल्लीतून झालेला आहे. अशी माझी माहिती आहे. जो पक्ष अमित शहांचा गुलाम आहे त्या पक्षांना स्वाभिमानाच्या गोष्टी करू नये, असा टोला राऊत यांनी शिंदे गटाला लगावला. 
 

Web Title: Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: Amit Thackeray decided to contest from Delhi; Sanjay Raut's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.