जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुजय विखेंचे ढोंग...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 03:31 PM2024-10-26T15:31:19+5:302024-10-26T15:32:33+5:30
Balasaheb Thorat on Sujay Vikhe Patil: जयश्री थोरात यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे. सुय विखेंनीही मी भाषण लिहीत होतो, ते काय बोलले ते ऐकले नाही, ते असे काहीतरी बोलतील म्हणून त्यांना दोन-तीनदा थांबविण्याचा प्रयत्न केला, असे म्हटले होते.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मुलीवर जयश्री थोरातांवर सुजय विखे यांच्या सभेत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले. यामुळे संगमनेरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वसंतराव देशमुख यांनी घाणेरडी भाषा वापरल्याचे समजताच महिलांनी आणि थोरात समर्थकांनी शुक्रवारी रात्री सभेमध्ये गोंधळ घातला तसेच तेथील गाड्या फोडल्या. रात्रभर पोलीस ठाण्याबाहेर बसून आंदोलने झाली आहेत. यानंतर चार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या साऱ्या प्रकारावर दिल्लीहून परतलेल्या बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जयश्री थोरात यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे. सुय विखेंनीही मी भाषण लिहीत होतो, ते काय बोलले ते ऐकले नाही, ते असे काहीतरी बोलतील म्हणून त्यांना दोन-तीनदा थांबविण्याचा प्रयत्न केला, असे म्हटले होते. देशमुखांवर कारवाई व्हावी तसेच गाड्या फोडणाऱ्यांवरही कारवाई व्हावी अशी मागणी विखे यांनी केली होती. यावर बाळासाहेब थोरात यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब थोरात यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यानंतर त्यांनी यावर भाष्य केले आहे.
पूर्वीचे राजकारण तात्विक पद्धतीने चालत होते. गेल्या ५ वर्षांत राजकारणाचा स्तर घसरला आहे. सुजय विखेंच्या कार्यकर्त्याने माझ्या मुलीबद्दल जे गलिच्छ वक्तव्य केले आहे. त्याचा महाराष्ट्रातून निषेध होत आहे. मी महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहे, यामुळे तेथील जनतेने आम्ही पाहून घेऊ असा मला निरोप धाडला आहे. म्हणून माझे कार्यकर्तेच हे प्रकरण पाहत आहेत, असे थोरात म्हणाले. जयश्री आणि जनता समर्थ आहे हे सांभाळायला, असे थोरात म्हणाले.
एकीकडे लाडकी बहीण योजना म्हणायचे आणि दुसरीकडे असले विचार ठेवायचे. त्या नेत्याच्या बोलण्यावर स्टेजवरील मंडळी टाळ्या वाजवत होती. हे किती दुर्दैवी होते. त्यांच्या मेंदूतच हा विचार आहे. अजूनही गुन्हेगाराला अटक झालेली नाही. तो कुठे लपून बसलाय ते शोधणे पोलिसांचे कर्तव्य आहे. जयश्री सोडा हे सर्व महिलांविरोधातील वक्तव्य आहे. प्रत्येकाच्या घरात मुलीबाळी आहेत. या मागचा जो मेंदू आहे यांनासुद्धा धडा शिकविण्याची वेळ आलेली आहे, अशी टीका थोरात यांनी केली.
विखे पाटीलनी काय आंदोलन करावे ते करावे. त्यांचे ढोंग जगाला माहिती आहे. सगळ्यांनी मतभेद विसरून निषेध करावे असे विखेंचे वागणे आहे, अशी टीका थोरात यांनी केली.