“भाजपा-RSS ने देशासाठी बलिदान दिले नाही, संविधान संपवायचे काम केले”: मल्लिकार्जुन खरगे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 05:21 PM2024-11-13T17:21:39+5:302024-11-13T17:25:36+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: २०२९ मध्ये इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात आणून राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे आहे त्यासाठी कामाला लागा, अशी सूचना काँग्रेस कार्यकर्त्यांना करण्यात आल्या आहेत.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress mallikarjun kharge criticizes bjp and rss in latur akkalkot rally | “भाजपा-RSS ने देशासाठी बलिदान दिले नाही, संविधान संपवायचे काम केले”: मल्लिकार्जुन खरगे

“भाजपा-RSS ने देशासाठी बलिदान दिले नाही, संविधान संपवायचे काम केले”: मल्लिकार्जुन खरगे

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: देश एक आणि अखंड आहे तरीही भाजपाचे नेते ‘बटेंगे कटेंगे’चा नारा देऊन दिशाभूल करत आहेत. भाजपा, RSS मधील कोणीही देशासाठी बलिदान दिलेले नाही, परंतु देशाचे ऐक्य व अखंडतेसाठी काँग्रेस पक्षाच्या तीन नेत्यांनी बलिदान दिले आहे. भाजपा व आरएसएस संविधानाला संपवण्याचे काम करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला त्यांना धडा शिकवा, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी लातूरअक्कलकोट येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. 

महाराष्ट्रातील भाजपा युती सरकारने जनतेला खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली. महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळत नाही. नरेंद्र मोदी कृषी मालावर जीएसटी लावून शेतकऱ्यांची लूट करत आहेत. पण सोयाबीन कापसाच्या एमएसपी मध्ये वाढ करत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीनला ६० हजार रुपये प्रतिक्विंटल एमएसपी देऊ, असे सांगितले होते, मात्र ते दिले नाही. भाजपा सरकार दिलेली आश्वासने कधीच पाळत नाही. भाजपा युतीच्या खोटारड्या व फसव्या सरकारला सत्तेवरून उखडून टाका आणि महाविकास आघाडीचे, लोकांच्या हिताचे सरकार स्थापन करा, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना व ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याचे आश्वासन दिले आहे. महाविकास आघाडीने पंचसुत्री कार्यक्रम दिला असून, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. महिलांना ३ हजार रुपये तसेच २५ लाखांचे विमा कवच दिले जाणार आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या लढाईत सहभाही होऊन महाराष्ट्राचा स्वाभिमान पुर्नस्थापित करण्यासाठी ही लढाई असून, २३ तारखेनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतवर येईल आणि २०२९ साली इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात आणून राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे आहे त्यासाठी कामाला लागा, असे अमित देशमुख म्हणाले.
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress mallikarjun kharge criticizes bjp and rss in latur akkalkot rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.