“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 11:34 PM2024-11-21T23:34:13+5:302024-11-21T23:36:16+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: एक्झिट पोल हे एक्झॅक्ट पोल नसतात. महाविकास आघाडी १६५ ते १७० जागा जिंकेल, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress vijay wadettiwar said maha vikas aghadi will win 165 to 170 seats and nana patole has nowhere said that he will be cm | “नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले

“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष २३ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालांकडे लागले आहे. मतदान संपताच एकामागोमाग एक असे जवळपास १० एक्झिट पोलचे अंदाज आले. यात बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार येत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु, काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्झिट पोल मान्य केलेले नाहीत. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. 

पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, या सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आक्रोश होता. त्यामुळे लोकांना बदल हवा आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी तोडफोड करून हे सरकार बनवले होते. एक्झिट पोल हे एक्झॅक्ट पोल नसतात. त्यामुळे २३ तारखेपर्यंत आपण सर्वांनी निकालाची वाट पाहाव. निकालात काय ते स्पष्ट होईल. यावर जास्त भाष्य करणार नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही

नाना पटोले यांनी ते मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही. महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत निर्णय घेऊ. प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारल्यामुळे संजय राऊत यांच्या तोंडून तसा शब्द निघाला असेल. मात्र, आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना मुख्यमंत्री व्हायचय असे कधीच म्हटलेले नाही, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा निकाल आमच्या बाजूने लागेल असा आम्हाला विश्वास आहे. महाविकास आघाडी १६५ ते १७० जागा जिंकेल, असे वडेट्टीवार म्हणालेत. तसेच प्रणिती शिंदे आणि ठाकरे गटात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. यातून महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. याबाबत बोलताना, यासंदर्भात दोन्ही पक्षाचे हाय कमांड लक्ष घालत आहे, त्यावर चांगला मार्ग काढला जाईल. तीन पक्ष एकत्र असल्यावर अशा गोष्टी होत असतात, कोणीही टोकाची भूमिका घेऊ नये. - पुढील काळात सरकारमध्ये हातात हात घालून एकत्र आपल्याला काम करायचे आहे त्यावर हाय कमांड नक्की तोडगा काढतील, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress vijay wadettiwar said maha vikas aghadi will win 165 to 170 seats and nana patole has nowhere said that he will be cm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.