आटपाडी : राज्यात मोठ्या संख्येने असणाऱ्या मराठा, धनगर व लिंगायत समाजाच्या आरक्षणाबाबत भाजपने फसवणूक केली असून, राज्यात असणारी महागाई, बेरोजगारी व भ्रष्टाचार हे महायुती सरकारचे पाप असून, पूर्वी असणारा भाजप पक्ष चांगला होता. मात्र, संगतीने तो बिघडला आहे. महाराष्ट्रातील राजकारण अतिशय गलिच्छ झाले आहे. आमच्या भावाने मागितलं असतं तर असेल नसेल तेवढं मी हसत हसत दिलं असतं. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन माझा जन्म झाला, यात माझी काय चूक, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.खानापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळे यांची आटपाडीत सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी वैभव पाटील, पै. चंद्रहार पाटील, रावसाहेब पाटील, हणमंतराव देशमुख, बाबासाहेब मुळीक, अनिता पाटील, सूरज पाटील उपस्थित होते.यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, विटा शहराला वैभव पाटील यांनी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये एक नंबरला आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला मूलभूत सुविधा देण्याबरोबरच बेरोजगारीला खत्म करण्याचा शब्द दिला आहे. शिवसेनेचे चिन्ह हे उद्धव ठाकरे यांचेच आहे. महाराष्ट्रमध्ये पक्ष फोडण्याचे जे कारस्थान झालंय त्यामागे अदृश्य शक्तीचा हात आहे. बदलापूर प्रकरणात गृहमंत्री यांचे बंदूक घेतलेले फोटो व्हायरल झाले होते. भाजप कार्यकर्त्यांना लाथा मारणारे नेते आहेत. खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांच्या बाबतीत चुकीचे शब्द वापरले. त्यांच्यावर संगतीचा परिणाम झाला आहे.या सरकारने बेरोजगारी, महागाई व भ्रष्टाचार वाढविला आहे. यावेळी वैभव पाटील म्हणाले, टेंभूसाठी सर्वच नेतेमंडळी व राजकीय पक्षांनी प्रयत्न केले आहेत. टेंभू योजना ही काही लोक फक्त आम्हीच केल्याचा दावा करीत आहेत. तुम्ही उपकार नाही केले. टेंभूच्या सहाव्या टप्प्याचे काम आचारसंहिता लागण्यापूर्वी घाईघाईने केले.राजेंद्रअण्णा देशमुख आपलेच, पण दुखावलेदरम्यान, यावेळी सुप्रिया सुळे यांनी अपक्ष उमेदवार माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या बाबत म्हणाल्या की, ते आपलेच आहेत. कारखान्याबाबत दुखावले आहेत. वैभव हे आमदार होणार आहेत. आमदार झाल्यावर तुम्ही त्यांच्याकडे जा भेट घ्या. त्यांना सर्वतोपरी मदत करू, असे सांगा.
धनगर, मराठा, लिंगायत समाजाची भाजपकडून फसवणूक; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांनाही टोला, म्हणाल्या..
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 4:09 PM