शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

Vidhan Sabha Election 2024: जिंकविण्यासाठी आलेले आता पराभवासाठी ताकद लावताहेत

By अविनाश कोळी | Published: November 14, 2024 6:24 PM

राजकारणातला गोंधळ सामान्यांना संभ्रमात टाकणारा

अविनाश कोळीसांगली : दोनाचे चार पक्ष झाल्यानंतर राज्यातच नव्हे तर जिल्ह्यातील राजकारणात तत्त्वांचा गोंधळ उडाला आहे. ज्यांच्या विजयासाठी मागील निवडणुकीत मतदारांना आवाहन केले होते आता त्याच्या पराभवासाठी नेत्यांना ताकद लावावी लागत आहे. दुसरीकडे ज्या उमेदवारांना व नेत्यांना टिकास्त्रांनी घायाळ केले, आता त्यांचेच गोडवे गाण्याची वेळही काही नेत्यांवर आली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत यंदा राजकारणातला हा ‘गोंधळात गोंधळ’ चित्रपट तुफान चालला आहे.राष्ट्रवादी व शिवसेनेत विभाजन झाल्यानंतर जिल्ह्यातही दोन्ही पक्षांच्या बाजूने नेत्यांची, कार्यकर्त्यांची विभागणी झाली. दोन पक्ष सत्ताधारी महायुतीत, तर अन्य दोन पक्ष महाआघाडीत सामील झाले. यामुळे मित्रांचे शत्रू व शत्रूचे मित्र, असे नवे राजकीय रसायन जनतेसमोर आले आहे.निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना नव्याने तयार झालेले राजकीय रसायन लोकांची संभ्रमावस्था वाढविणारे ठरत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांचा प्रचार केला आता त्यांच्या पाडावासाठी ते धडपड करत आहेत. याउलट ज्या भाजपविरोधात त्यांनी रान उठविले होते आता त्यांच्याच उमेदवाराचा प्रचार करण्यात ते व्यस्त दिसताहेत.शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी खानापूर येथील ज्या उमेदवाराच्या विजयासाठी धडपड केली आता त्यांच्याच गटातील उमेदवाराच्या पराभवासाठी त्यांची फौज काम करीत आहे. पलूस-कडेगावमध्ये शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी काँग्रेस उमेदवाराविरोधात निवडणूक लढविली होती आता तेच उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारकार्यात सहभागी आहेत.

स्थानिक पातळीवरही भूमिका बदलल्यासांगलीतील प्रा. पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी मागील निवडणुकीत भाजपविरोधात काम केले, आता ते राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे भाजपच्या प्रचारात सहभागी आहेत. मिरजेत आमदार इद्रिस नायकवडी यांनी पूर्वी भाजपविरोधात काम केले ते आता भाजपचे मित्र बनलेत. हीच स्थिती जिल्ह्याच्या अन्य मतदारसंघातही कमी-अधिक प्रमाणात आहे.

पडळकरांच्या भूमिकेत बदलमागील काही विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खानापूरमधून बाबर गटाविरोधात निवडणुका लढविल्या होत्या. आता त्यांचा गट महायुतीचा घटक म्हणून त्यांच्या प्रचारात सक्रिय आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलVishwajeet Kadamविश्वजीत कदमsangli-acसांगलीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024