लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मलबार हिलमधून पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी भाजपकडून गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती ४३६ कोटी ८० लाख ४८ हजार ५९१ असल्याचे जाहीर केले. २०१९ च्या निवडणुकीत मंगल प्रभात लोढा यांनी प्रतिज्ञापत्रात ४४१ कोटींहून अधिक संपत्ती जाहीर केली होती.
२०२४ मधील मालमत्ता
स्वत:च्या नावे पत्नीच्या नावेजंगम १२३,३८,९८,५८८ १०,२८,७५,३४०स्थावर १२५,५४,४९,७०७ -कर्ज १८२,९३,७३,५१८ १,२३,२८,९९,११२रोख २,१२,३७६ -बाँड ३,००,००० २,००,०००शेअर्स ४,०४,९४,६३३ ४,०४,५४,६३८सोने ६,७६,८६,५५२ ८,१२,२३,४४९
पाच वर्षांत ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
उद्धवसेनेचे वरळीतील उमेदवार आदित्य ठाकरे यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत ४ कोटींची वाढ झाली आहे. गुरुवारी निवडणूक अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी चल आणि अचल संपत्तीचा तपशील दाखल केला आहे. २०१९ मध्ये त्यांची संपत्ती १९,०५,०६,१७२ इतकी होती. तर, २०२४ मध्ये त्यांनी प्रतिज्ञापत्रात २१,४७,५४,४१० संपत्ती जाहीर केली आहे.
१.४८ कोटी किमतीची रायगडमध्ये शेतजमीन, ४३,७६,२१२ इतके कर्ज
संपत्ती २०१९ २०२४ चल ११,३८,०५,२५८ १५,४३,०३,०६० अचल ७,६७,००,९१४ ६,०४,५१,३५० वाहन ६,५०,००० ४,२१,२०० सोने ६४,६५,०७४ १,९१,०७,१५९
जितेंद्र आव्हाडांच्या संपत्तीत ५ कोटींनी वाढ
मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार आव्हाड पती-पत्नीच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत वाढ झाली. २०१९ मध्ये त्यांची संपत्ती ४७ कोटी ८९ लाख ३६ हजार ५५३ एवढी होती. आता ती ५३ कोटी ०५ लाख ७२ हजार २७३ एवढी झाली आहे.
मालमत्तांचा तपशील
संपत्ती २०१९ २०२४ रोख १,५०,००० २,२२,८८०पत्नी १,२५,००० १,५०,०००जंगम १३,७५,१९,५९८ २०,६७,८७,५६६पत्नी ५,१८,५८,८६३ १९,४७,७७,८४३स्थावर २७,९१,३३,०९१ ३२,३७,८४,७०७पत्नी १,०४,२५,००० ३१,०५,६६,७२७कर्ज ३७,५८,८१,२९९ ८६,२७,८७,४०७