Ajit Pawar: भाजपचा विरोध, तरीही नवाब मलिकांना उमेदवारी का दिली? अजित पवारांनी मांडली भूमिका...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 11:24 AM2024-10-30T11:24:27+5:302024-10-30T11:36:36+5:30

Ajit pawar on Nawab Malik: नवाब मलिक यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. मनी लाँड्रिंग, दाऊदशी संबंध असे गंभीर आरोप केले होते. यामुळे मलिक यांना सोबत घेण्यास भाजपाचा विरोध होता.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: Opposition to BJP, why Nawab Malik was nominated? Ajit Pawar said the ncp stand | Ajit Pawar: भाजपचा विरोध, तरीही नवाब मलिकांना उमेदवारी का दिली? अजित पवारांनी मांडली भूमिका...

Ajit Pawar: भाजपचा विरोध, तरीही नवाब मलिकांना उमेदवारी का दिली? अजित पवारांनी मांडली भूमिका...

भाजपाचा विरोध असूनही अजित पवारांनी अखेरच्या दिवशी पत्ते खोलत नवाब मलिकांना उमेदवारी जाहीर केली. यावरून महायुतीत वाद होण्याची चिन्हे असताना अजित पवारांनीनवाब मलिकांना उमेदवारी देण्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. मलिक यांच्यावर आरोप झाले आहेत, त्यात तथ्य नसल्याचे आमचे म्हणणे आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

नवाब मलिक यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. मनी लाँड्रिंग, दाऊदशी संबंध असे गंभीर आरोप केले होते. यामुळे मलिक यांना सोबत घेण्यास भाजपाचा विरोध होता. मलिक यांना उमेदवारी देण्यास अजित पवारांना भाजपाने विरोध केला होता. तरीही २९ ऑक्टोबरला अखेरच्या क्षणाला अजित पवारांनी मलिक यांना एबी फॉर्म दिला आणि मलिकांनी उमेदवारी दाखल केली आहे.

एबीपी माझावरील मुलाखतीत अजित पवार यांनी यावर खुलासा केला आहे. नवाब मलिक यांच्यावर वेगवेगळे आरोप झाले, सिद्ध झालेले नाहीत. माझ्यावरही अनेक आरोप झाले. एखादा पुढे जात असेल, शक्तीस्थळावर आघात करण्यासाठी आरोप केले जातात. राजीव गांधी यांची मिस्टर क्लीन अशी इमेज होती. ती डॅमेज केल्याशिवाय त्यांची ताकद कमी करता येणार नाही. बोफोर्सचे आरोप झाले आणि इंदिरा गांधींपेक्षा जास्त जागा निवडून आणलेल्या नेत्याला फटका बसला. यामुळे आरोप असणे वेगळे, एखादा आरोप सिद्ध होणे वेगळे. मलिक यांच्यावर आरोप झालेला आहे, त्यात तथ्य नसल्याचे आमचे म्हणणे आहे, असे अजित पवार म्हणाले.

कमी जागा का घेतल्या...
५५ जागा वाटपावर अजित पवार यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. उमेदवारी अर्ज मागे घेणार तेव्हा तुम्हाला समजेल. अधाशासारख्या जास्त जागा घेऊन शून्य निवडून आणायच्या नाहीत. आवाक्यात जागा घेऊन त्या निवडून आणण्यासाठी प्रयत्न आहेत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: Opposition to BJP, why Nawab Malik was nominated? Ajit Pawar said the ncp stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.