Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून त्या त्या पक्षातील बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. ही मनधरणी यशस्वी होणार का, याचे उत्तर अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर मिळणार आहे. निवडणुकीसाठी अनेक जण इच्छूक होते. अनेकांनी उमेदवारीसाठी आपले सर्व वजन पणाला लावले. अनेकांना त्या त्या पक्षांकडून उमेदवारीही जाहीर झाली. परंतु, काही जणांना संधी मिळाली नाही. महायुतीचा विचार केल्यास भाजपामधील १७ इच्छुकांनी मित्र पक्षात जाऊन उमेदवारी पक्की केल्याचे पाहायला मिळाले.
भाजपाच्या १२ इच्छुकांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. तर चार जणांनी अजित पवारांच्या पक्षात जाऊन उमेदवारी पदरात पाडून घेतली. आरपीआयच्या कोट्यातून एक जागा मिळाली आहे. तो उमेदवार भाजपाच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत असल्याचे सांगितले जात आहे. भाजपाची उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर आपल्याला संधी मिळाली नाही किंवा ती जागा मित्र पक्षाला सुटली, हे पाहून इच्छुकांनी पक्षांतर करत निवडणूक रिंगणात जागा पक्की केली. मूळ भाजपामध्ये असलेले परंतु, शिवसेना शिंदे गटात आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाऊन उमेदवारी मिळवलेल्या इच्छुकांची संख्या १७ वर जात असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे भाजपाने निवडणुकीच्या जागावाटपात १५२+ १७ अशी १६९ जागांची बाजी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.
भाजपामधून शिवसेना शिंदे गटात जात उमेदवारी मिळालेले नेते कोण?
निलेश राणे - कुडाळसंजय जाधव दानवे - कणंदराजेंद्र गावित - पालघरविलास तरे - बोईसरसंतोष शेट्टी - भिवंडीमुरजी पटेल - अंधेरी पूर्वशायना एनसी - मुंबादेवीअमोल खताळ - संगमनेरअजित पिंगळे - धाराशिवदिग्विजय बागल - करमाळाविठ्ठल लांघे - नेवासाबळीराम शिर्सेकर - बदलापूर
भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात गेलेले नेते कोण?
राजकुमार बडोले - अर्जुनी मोरगावप्रतापराव चिखलीकर - लोहासंजयकाका पाटील - तासगावनिशिकांत पाटील - इस्लामपूर