शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान; चर्चांना उधाण
2
'भाजपच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा; आमच्या मनात किंतु परंतु नाही,' एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती
3
झोमॅटोची शानदार ऑफर! फक्त 30 रुपये भरा अन् 6 महिन्यांपर्यंत मिळवा फ्री फूड डिलिव्हरी!
4
EVM हॅकिंगचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल;  निवडणूक आयोगाने दिलं सविस्तर स्पष्टीकरण
5
BSNL चे 5 सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, किंमत 100 रुपयांपेक्षा कमी
6
२०२३-२४ मध्ये सात राज्यांत लाडक्या बहिणींमुळे सत्ता आली, राजस्थानमध्ये गेली... नेमके काय घडले...
7
मनसेला पुन्हा धक्का! पराभूत अविनाश जाधवांनी घेतला मोठा निर्णय; राज ठाकरेंना लिहिले पत्र
8
“उद्धव ठाकरे सोबत असते तर आतापेक्षा जास्त बहुमत मिळाले असते”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
आता 'या' मंदिर परिसरात राजकीय आणि द्वेषपूर्ण भाषणांना बंदी, कारण...
10
VIDEO: भन्नाट जुगाड! JCB ला ट्रॉली लटकवून मजुरांनी तिसऱ्या मजल्यावर केलं भिंतीला प्लास्टर
11
कोरोनापासून मोठ्या जॅकपॉटच्या मागावर होता चीन; आता १००० मेट्रीक टनांचा खजिनाच हाती लागला... 
12
"...तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो"; मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता
13
चंद्रबाबू नायडू सरकारचा मोठा निर्णय! आंध्र प्रदेशातील वक्फ बोर्ड केलं बरखास्त
14
“EVMमध्ये गडबड, ठोस पुरावा मिळणे कठीण, आंतरराष्ट्रीय स्तरावर तपासणी करा”: पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांनी बिग बींकडे मागितले होते उसने पैसे! कारण ऐकून बॉलिवूडचा 'शहेनशाह' झाला थक्क
16
कारमध्ये 'या' गोष्टी ठेवल्या पाहिजेत, प्रवासादरम्यान येणाऱ्या समस्या होतील दूर!
17
देवेंद्र फडणवीसांनी केला एकनाथ शिंदेंना फोन, तब्येतीची विचारपूस; मुंबईत कधी परतणार?
18
“राज्यातील गंभीर परिस्थिती, पेचप्रसंगाला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार आहेत”: संजय राऊत
19
दिल्ली - मुंबई एक्स्प्रेस वेवर निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला; एका मजुराचा मृत्यू, तिघे जखमी
20
देव दीपावली: ७ राशींवर अपार कृपा, सुख-सौभाग्य प्राप्ती; यश-प्रगती, लाभच लाभ, शुभ घडेल!

देवेंद्र फडणवीसांनी केला एकनाथ शिंदेंना फोन, तब्येतीची विचारपूस; मुंबईत कधी परतणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2024 1:53 PM

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकनाथ शिंदे मुंबईत परतल्यानंतर महायुतीची एक महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठवडाभरानंतर महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार, याबाबत स्पष्टता आली आहे. राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे. महाविकास आघाडीचे नेते सातत्याने ईव्हीएम मशीनवरून टीकास्त्र सोडत असून, फेरमतमोजणीसाठी उमेदवार अर्ज करत आहेत. आपल्या गावी केलेल्या काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. 

एकनाथ शिंदे हे आपल्या साताऱ्यातील मूळ गावी आहेत. सत्ता स्थापनेच्या धावपळीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते. गावी आल्यानंतर एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडल्याची माहिती मिळाली. दरे येथील त्यांच्या बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल झाली. डॉक्टरांनी उपचार सुरू केले आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव शिंदे यांनी घरीच आराम करणे पसंत केले. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोन करून तब्येतीची विचारपूस केल्याचे सांगितले जात आहे. याबाबत

एकनाथ शिंदे मुंबईत केव्हा परतणार?

एकीकडे महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. कोणते नेते, मंत्री येणार, याबाबत अंतिम यादी तयार केली जात आहे. तशी निमंत्रणे, आमंत्रणे पाठवली जात आहेत. मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. तसेच महायुतीतील किती जण त्या दिवशी शपथ घेणार, खातेवाटप काय होणार, याबाबत अद्यापही निर्णय झाले नसल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे गावी निघून गेल्यामुळे महायुतीची बैठक लांबणीवर पडली. आज सायंकाळी एकनाथ शिंदे गावाहून निघून ठाणे येथे येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर महायुतीची बैठक होऊन, सर्व मुद्दे अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान,  डॉ. आर. एम. पार्टे हे एकनाथ शिंदे यांच्यावर उपचार करत आहेत. डॉक्टर म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना ताप येत आहे, सर्दी आहे, घशाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर आता उपचार सुरू केले आहेत. सलाइन लावले आहे. आयव्ही लावला आहे. त्यांना एक दोन दिवसांत बरे वाटले याची खात्री आहे. आता प्रकृती चांगली आहे. लवकरच ते मुंबईला जाणार आहेत. तसेच प्रकृती बरी नसल्याने एकनाथ शिंदे यांनी अनेकांची भेट नाकारली.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे