शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान; चर्चांना उधाण
2
'भाजपच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा; आमच्या मनात किंतु परंतु नाही,' एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती
3
झोमॅटोची शानदार ऑफर! फक्त 30 रुपये भरा अन् 6 महिन्यांपर्यंत मिळवा फ्री फूड डिलिव्हरी!
4
EVM हॅकिंगचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल;  निवडणूक आयोगाने दिलं सविस्तर स्पष्टीकरण
5
BSNL चे 5 सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, किंमत 100 रुपयांपेक्षा कमी
6
२०२३-२४ मध्ये सात राज्यांत लाडक्या बहिणींमुळे सत्ता आली, राजस्थानमध्ये गेली... नेमके काय घडले...
7
मनसेला पुन्हा धक्का! पराभूत अविनाश जाधवांनी घेतला मोठा निर्णय; राज ठाकरेंना लिहिले पत्र
8
“उद्धव ठाकरे सोबत असते तर आतापेक्षा जास्त बहुमत मिळाले असते”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
आता 'या' मंदिर परिसरात राजकीय आणि द्वेषपूर्ण भाषणांना बंदी, कारण...
10
VIDEO: भन्नाट जुगाड! JCB ला ट्रॉली लटकवून मजुरांनी तिसऱ्या मजल्यावर केलं भिंतीला प्लास्टर
11
कोरोनापासून मोठ्या जॅकपॉटच्या मागावर होता चीन; आता १००० मेट्रीक टनांचा खजिनाच हाती लागला... 
12
"...तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो"; मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता
13
चंद्रबाबू नायडू सरकारचा मोठा निर्णय! आंध्र प्रदेशातील वक्फ बोर्ड केलं बरखास्त
14
“EVMमध्ये गडबड, ठोस पुरावा मिळणे कठीण, आंतरराष्ट्रीय स्तरावर तपासणी करा”: पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांनी बिग बींकडे मागितले होते उसने पैसे! कारण ऐकून बॉलिवूडचा 'शहेनशाह' झाला थक्क
16
कारमध्ये 'या' गोष्टी ठेवल्या पाहिजेत, प्रवासादरम्यान येणाऱ्या समस्या होतील दूर!
17
देवेंद्र फडणवीसांनी केला एकनाथ शिंदेंना फोन, तब्येतीची विचारपूस; मुंबईत कधी परतणार?
18
“राज्यातील गंभीर परिस्थिती, पेचप्रसंगाला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार आहेत”: संजय राऊत
19
दिल्ली - मुंबई एक्स्प्रेस वेवर निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला; एका मजुराचा मृत्यू, तिघे जखमी
20
देव दीपावली: ७ राशींवर अपार कृपा, सुख-सौभाग्य प्राप्ती; यश-प्रगती, लाभच लाभ, शुभ घडेल!

“EVMमध्ये गडबड, ठोस पुरावा मिळणे कठीण, आंतरराष्ट्रीय स्तरावर तपासणी करा”: पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2024 2:37 PM

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: ईव्हीएम मशीन विरोधकांच्या हातात द्याव्यात, शरद पवारांना लोकसभेत मिळालेले यश पाहता विधानसभेत इतके अपयश मिळेल का, अशी विचारणा पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठवडाभरानंतर महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार, याबाबत स्पष्टता आली आहे. राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे. महाविकास आघाडीचे नेते सातत्याने ईव्हीएम मशीनवरून टीकास्त्र सोडत असून, मोठ्या प्रमाणावर उमेदवार फेरमतमोजणीसाठी अर्ज करताना दिसत आहेत. यातच महाविकास आघाडी ईव्हीएमविरोधातील मोहीम तीव्र करताना पाहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ईव्हीएमची आंतरराष्ट्रीय स्तरावर तपासणी करावी, अशी मागणी केली आहे. 

जे निकाल लागले आहेत, ते अनपेक्षित होते. मी जवळजवळ सात सार्वत्रिक निवडणुका लढलो आहे. कार्यकर्त्यांना अंदाज येत असतो. लोकशाही वाचवण्यासाठी बाबा आढाव यांनी आंदोलन केले. ५ महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीला मोठ्या जागा मिळाल्या होत्या. पण विधानसभेला इतका मोठा बदल होईल असे दिसत नाही. प्रत्येकाला आत्मविश्वास होता सत्ता बदल होणार आहे. पक्षफुटीचा जो विषय झाला, त्याचा काहीच फरक पडला नाही, याचा विश्वास बसत नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

EVMमध्ये गडबड, आंतरराष्ट्रीय स्तरावर तपासणी करा

EVMमध्ये गडबड आहे. पण याबाबतचा ठोस पुरावा मिळणं कठीण आहे. १०० टक्के VVPATमधील चिठ्ठ्या मोजा. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांकडून ईव्हीएम मशीनची तपासणी करायला हवी, हीच आमची प्रमुख मागणी आहे. तेव्हाच जनतेचा १०० टक्के विश्वास निवडणूक आयोगावर बसेल. राज्यातील निकाल अनपेक्षित लागलेत. एखादी हवा असेल तर नक्कीच उमेदवारांना अंदाज येतो, तेव्हा असा निकाल मानला जातो. पण लोकसभेतील निकाल आणि विधानसभेचा निकाल यात मोठी तफावत आहे. लोकसभा आणि विधानसभेतील मतदानाची टक्केवारी पाहता, हा बदल शंशयास्पद आहे. लोकसभेतील ज्या मतदारांनी महायुतीविरोधात मतदान केले, तेच मतदार ४ महिन्यात त्यांच्या बाजूने कसे काय मतदान करू शकतात, अशी विचारणा पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. 

दरम्यान, मशीनमध्ये टेम्परिंग केले असेल तर कसे सिद्ध होणार? मूळात ईव्हीएम मशीन विरोधकांच्या हातात द्याव्यात ना? शरद पवार गटाला लोकसभेत मिळालेले यश पाहता विधानसभेत इतके अपयश मिळेल का? याचे संशोधन करायची गरज नाही. निवडून आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह या दोघांच्या संमतीनेच निवडणूक आयोगाचे अधिकारी नेमले जातील, असा कायदा लोकसभेत पारित केला गेला. तेव्हाच आम्हाला वाटले होते, आता निवडणुका पारदर्शी होणार नाहीत? अशी शंका आम्हाला मनात आली होतीच, अपेक्षेनुसार तेच झाले, असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसEVM Machineईव्हीएम मशीन