Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. अवघ्या राज्याचे लक्ष काय निकाल लागणार याकडे लागले आहे. जवळपास सर्वच ठिकाणचे चित्र स्पष्ट झालेले आहे. अनेक ठिकाणी उमेदवार विजयी घोषित करण्यात आले आहेत. सायंकाळी ४.३० पर्यंत जे कल आहेत, त्यानुसार महायुतीचे २३२ जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीचे ४२ उमेदवार आघाडीवर आहेत. तर ४ अपक्ष आघाडीवर आहेत.
या विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत हाती केलेले कल, काही निकाल आणि बहुतांश राऊंडपर्यंत मतमोजणी लक्षात ठेवल्यास राज्यभरातील १० असे बडे नेते आहेत. जे जायंट किलर ठरले आहेत. यातील अनेक नेत्यांनी समोरच्या उमेदवाराला तब्बल ०१ लाखांहून अधिक मताधिक्याने पराभूत केले आहे. राज्यातील टॉप १० मोठ्या फरकाने जिंकलेले नेते कोण आहेत? एक नजर टाकूया...
सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
१. सातारा मतदारसंघ - भाजपा उमेदवार शिवेंद्रराजे भोसले - ०१ लाख ४२ हजार १२४ मताधिक्याने विजयी.
२. परळी मतदारसंघ - अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे - ०१ लाख ३८ हजार २४१ मतांची विजयी आघाडी - २६ पैकी २३ राऊंडची मतमोजणी पूर्ण.
३. कोपरगाव मतदारसंघ - अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे - ०१ लाख २४ हजार ६२४ मतांनी विजयी.
४. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ - शिवसेना उमेदवार एकनाथ शिंदे - ०१ लाख २० हजार ३३५ मतांची विजयी आघाडी - २८ पैकी २७ राऊंडची मतमोजणी पूर्ण.
५. बारामती मतदारसंघ - राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार अजित पवार - ०१ लाख ८९९ मतांनी विजयी.
६. कोथरुड मतदारसंघ - भाजपा उमेदवार चंद्रकांत पाटील - ०१ लाख १२ हजार ०४१ मतांची विजयी आघाडी - २१ पैकी २१ राऊंडची मतमोजणी पूर्ण.
७. चिंचवड मतदारसंघ - भाजपा उमेदवार पांडूरंग जगताप - ०१ लाख ०३ हजार ८६५ मतांनी विजयी.
८. मावळ मतदारसंघ - अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके - ०१ लाख ०८ हजार ५६५ मतांची विजयी आघाडी - २९ पैकी २९ राऊंडची मतमोजणी पूर्ण.
९. मुंब्रा कळवा मतदारसंघ - शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड - ९६ हजार २२८ मतांनी विजयी.
१०. बोरिवली मतदारसंघ - भाजपा उमेदवार संजय उपाध्याय - ९५ हजार ०५४ मतांची विजयी आघाडी - २३ पैकी २२ राऊंडची मतमोजणी पूर्ण.
११. पुसद मतदारसंघ - अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार इंद्रनील नाईक - ९० हजार ७६९ मतांची विजयी आघाडी - २५ पैकी २५ राऊंडची मतमोजणी पूर्ण.
१२. उदगीर मतदारसंघ - अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय बनसोडे - ९३ हजार २१४ मतांनी विजयी.
दरम्यान, अनेक ठिकाणची अंतिम मतमोजणी अद्यापही बाकी आहे. अनेक ठिकाणी सगळ्या राऊंडची मतमोजणी पूर्ण झालेली असली, तरी निवडणूक आयोगाकडून अधिकृतरित्या विजयी घोषित केले नाही. त्यामुळे सर्व ठिकाणची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम आकडा, मते समजू शकतील.