शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

तात्यासाहेबांचे घर फोडले? मी तेव्हा १४ वर्षांचा अन् दादा १८; श्रीनिवास पवारांचे अजित पवारांना प्रत्यूत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 1:52 PM

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: आता माघार नाही, अजित पवार यांनी घातलेला घाव विसरता येणार नाही - श्रीनिवास पवार

बारामती विधानसभेचा अर्ज भरल्यानंतर अजित पवारांनीशरद पवारांवर आरोप करत त्यांनी तात्यासाहेबांचे घर फोडल्याचे प्रश्न विचारत म्हटले आहे. यावरून अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. अजित पवार सोमवारी भावुक झाले होते. यावर श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांनी चूक मान्य केली असली, तरीदेखील आता माघार नाही. युगेंद्र पवार यांची उमेदवारी कायम आहे. अजित पवार यांनी घातलेला घाव विसरता येणार नाही, असे स्पष्ट केले होते. 

आता आज पुन्हा श्रीनिवास पवार यांनी तात्यासाहेबांचे घर फोडले या आरोपावर अजित पवारांना त्या काळाची आठवण करून दिली आहे. अजित पवारांचा हा फार चुकीचा आणि दुर्दैवी आरोप आहे. त्यांचे वक्तव्य ऐकून मला वाईट वाटले आहे. माझे वडील गेले तेव्हा मी १४ आणि दादा १८ वर्षांचा होता. शरद पवारांना आम्ही तात्यासाहेबांच्या जागी पाहिले. आताही पाहत राहू. शरद पवारांवर असा आरोप करणे अत्यंत दुर्दैवी आहे, असे श्रीनिवास म्हणाले. 

शरद पवारांनी ३० वर्षे बारामती सांभाळली, पुढे अजित पवारांकडे दिली, त्यांनी ३० वर्षे सांभाळली. आता नव्या पिढीकडे द्यायला हवी. अजित पवारांनी युगेंद्रला उमेदवारी मागे घेण्यास सांगितले तसे मी दादाला सांगणार नाही. प्रत्येकाने आपापला विचार करावा. भावनिक करतील असे आरोप करून आपणच भावनिक व्हायचे आणि कुटुंबाला मध्ये आणायचे हे बरोबर नाही, अशी टीका श्रीनिवास पवार यांनी केली. कुटुंबातील चार गोष्टी चार चौकटीतच रहायला हव्यात हे आपणच सांगत फिरायचे आणि या गोष्टी आपणच लोकांना सांगून मोकळे व्हायचे, हे बरोबर नाही, असेही ते म्हणाले. 

अजित पवार काय म्हणालेले...आई सांगतेय, माझ्या दादाच्या विरोधात कोणीही फॉर्म भरू नका. या पद्धतीने जे चाललंय ते बरोबर नाही. मग, याबाबत कुटुंबातील मोठ्या व्यक्तीने यामध्ये सांगायला पाहिजे होते. त्यांना फाॅर्म भरायला कोणी सांगितला होता, ‘साहेबां’नी सांगितले, मग आता साहेबांनी तात्यासाहेबांचे घर फोडले, असे म्हणायचे का? या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला; यावेळी अजित पवार यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारbaramati-acबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेस