“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 10:09 PM2024-11-18T22:09:52+5:302024-11-18T22:10:55+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विश्वजित कदम यांच्या विजयाचा आवाज नरेंद्र मोदींपर्यंत जाऊ द्या. महायुतीची अखेरची घटका सुरू आहे. या धास्तीने पंतप्रधान मोदी परदेशात भ्रमंती करत आहेत, अशी टीका करण्यात आली आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. प्रचारतोफा थंडावल्या आहेत. आता मतदानादिवशी जनतेचा कौल कोणाला मिळणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. विश्वजित कदम दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील. विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे, असा दावा करण्यात आला आहे.
विश्वजित कदम यांचा दीड लाखांहून अधिक मतांनी विजय होईल. विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करा. विश्वजित कदम यांच्या विजयाचा आवाज नरेंद्र मोदींपर्यंत जाऊ द्या. महायुतीची अखेरची घटका सुरू आहे. या धास्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात भ्रमंती करत आहेत. वीरभूमीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार आहे, असे तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेवंथ रेड्डी महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत. तसेच तेलंगणमधील योजना यशस्वी केल्याचा दावा करत महाविकास आघाडीचे सरकार आणण्याचे आवाहन करत आहेत.
येणारे सरकार महाविकास आघाडीचे असणार आहे
महाराष्ट्र ही शूरवीरांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही रत्ने महाराष्ट्राने दिली. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे हे याच भूमीचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी मोदींची गुलामी पत्करली आहे. पवित्र भूमीला अपवित्र करण्याचे काम केले आहे. शूरवीरांच्या भूमीला महायुतीच्या नेत्यांनी कलंक लावला. येणारे सरकार महाविकास आघाडीचे असणार आहे, असे रेवंथ रेड्डी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कडेगावच्या मातीने यशवंतराव चव्हाण, डॉ. पतंगराव कदम महाराष्ट्राला दिले. डॉ. विश्वजित कदम यांना मी नेता मानले आहे. महाविकास आघाडी सरकारात ते कॅबिनेट मंत्री असतील. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहतो. अख्खे कदम कुटुंब लोकांसाठी राबते आहे. भाजपाचा उमेदवार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष होते, त्यांनी काय काम केले ते सांगावे, असे आव्हान खासदार विशाल पाटील यांनी दिले.