Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 06:03 PM2024-10-23T18:03:32+5:302024-10-23T18:06:30+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election : उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार हे निश्चित झाले आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसने आज उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत ३८ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारबारामती विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. यामुळे आता त्यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून कोण निवडणूक लढणार या चर्चा सुरू असून आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार गटाच्या उमेदवाराचे नाव सांगितले आहे.
जनतेच्या मनातला सामान्य आमदार मिळेल; उमेदवारी घोषित होताच महेश सावंत यांचा टोला
गेल्या काही दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवारबारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार नसल्याचे बोलले जात होते. आज उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर अजित पवार बारामतीमधूनच लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळणार या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, या चर्चांना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पूर्णविराम दिला आहे.
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पत्रकारांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून कोण लढणार असा प्रश्न केला. यावेळी आव्हाड यांनी युगेंद्र पवार यांच्या नावाचा उल्लेख केला. आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, बारामती विधानसभेतून कदाचित मला असं वाटतंय की युगेंद्र पवार हे आमचे उमेदवार असतील. मला अजून याबाबतीत खात्री नाही, असंही आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.
"महाविकास आघाडीमध्ये एखाद्या, दुसऱ्या जागेवर चर्चा सुरू आहे. काही दिवसात होईल पूर्ण. शरद पवार माझा अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत, असंही आव्हाड म्हणाले.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने ३८ नावांची केली घोषणा
१. बारामती - अजित पवार
२. येवला - छगन भुजबळ
३. आंबेगाव - दिलीप वळसे-पाटील
४ कागल - हसन मुश्रीफ
५. परळी - धनंजय मुंडे
६. दिंडोरी - नरहरी झिरवाळ
७.अहेरी - धर्मराव बाबा आत्राम
८. श्रीवर्धन - आदिती तटकरे
९. अंमळनेर - अनिल भाईदास पाटील
१०. उदगीर- संजय बनसोडे
११. अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले
१२. माजलगाव- प्रकाश दादा सोळंके
१३ वाई - मकरंद पाटील
१४.सिन्नर- माणिकराव कोकाटे
१५. खेड आळंदी- दिलीप मोहिते
१६. अहमदनगर शहर- संग्राम जगताप
१७. इंदापूर - दत्तात्रय भरणे
१८.अहमदपूर- बाबासाहेब पाटील
१९. शहापूर - दौलत दरोडा
२०. पिंपरी- अण्णा बनसोडे
२१. कळवण- नितीन पवार
२२. कोपरगाव- आशुतोष काळे
२३.अकोले- डॉ. किरण लहामटे
२४. बसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
२५. चिपळूण- शेखर निकम
२६. मावळ- सुनील शेळके
२७. जुन्नर- अतुल बेनके
२८.मोहोळ- यशवंत विठ्ठल माने
२९. हडपसर- चेतन तुपे
३०. देवळाली- सरोज आहिरे
३१. चंदगड- राजेश पाटील
३२. इगतपुरी- हिरामण खोसकर
३३. तुमसर- राजू कारेमोरे
३४. पुसद- इंद्रनील नाईक
३५. अमरावती शहर- सुलभा खोडके
३६. नवापुर-भरत गावित
३७. पाथरी- निर्मला उत्तमराव विटेकर
३८. मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला