भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 06:09 PM2024-11-07T18:09:46+5:302024-11-07T18:10:07+5:30

काँग्रेसने विविध राज्यांत दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, अशा आशयाची आज विविध वृत्तपत्रांत जाहिरात देण्यात आली होती.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election BJP prints fake ad; Complaint of Congress to the Chief Election Officer  | भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 

भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 

काँग्रेसने विविध राज्यांत दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, अशा आशयाची आज विविध वृत्तपत्रांत जाहिरात देण्यात आली होती. याविरोधात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. भाजपनेच ही जाहिरात दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

भाजपने एक खोटी जाहिरात दिली आहे. काँग्रेस सरकारने वेगवेगळ्या राज्यात खोट्या गॅरंटी दिल्या त्या पूर्ण केल्या नाहीत अशी जाहिरात केली आहे. हे खोटे आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले आहे. तसेच भाजपवर कारवाईची मागणी केल्याचे काँग्रेसचे कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे. 

आम्ही निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुन्हा अशा जाहिराती येता नयेत असेही सांगितले आहे. काही जाहिरातींमध्ये प्रकाशकाचे नाव दिलेले नाही, असे काँग्रेस कमिटीच्या माध्यम व प्रसिद्धी विभाग चेअरमन पवन खेरा यांनी म्हटले. 

देवेंद्र फडणवीस, भाजपा हे सनसनाटी उडवून सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. गेल्यावेळी पंतप्रधानांना मारण्याचा डाव असल्याचे सांगितले गेले. परंतू तो प्लाँटेड मेल होता. प्रत्येक वेळी निवडणूक हरायला येतात, तेव्हा असे रिपोर्ट व आरोप केले जातात, असा आरोप खेरा यांनी केला. 
 

Web Title: Maharashtra Assembly Vidhan Sabha Election BJP prints fake ad; Complaint of Congress to the Chief Election Officer 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.