अजित पवारांच्या उमेदवाराविरोधात तिकीट दिले, शिंदेंनी ऐनवेळी सभा रद्द केली; उमेदवार रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 02:31 PM2024-11-11T14:31:08+5:302024-11-11T14:31:48+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election: शिंदे यांनी श्रीरामपूरमधील सभा रद्द केली असली तरी शेजारीच असलेल्या नेवासामध्ये त्यांची सभा होत आहे. यामुळे ही सभा रद्द करण्यामागचे कारण काय, याची चर्चा रंगली आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election: Given ticket against Ajit Pawar's candidate, Eknath Shinde cancels rally on time; Shivsena candidate bhausaheb Kamble at the hospital high blood pressure shrirampur | अजित पवारांच्या उमेदवाराविरोधात तिकीट दिले, शिंदेंनी ऐनवेळी सभा रद्द केली; उमेदवार रुग्णालयात

अजित पवारांच्या उमेदवाराविरोधात तिकीट दिले, शिंदेंनी ऐनवेळी सभा रद्द केली; उमेदवार रुग्णालयात

महायुतीत शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी यांनी काही जागांवर एकमेकांविरोधात उमेदवार दिले आहेत. यामुळे या ठिकाणचे उमेदवार चिंतेत आहेत. एकीकडे महायुतीत आहे म्हणायचे आणि दुसरीकडे एकमेकांविरोधात प्रचार करायचा अशी परिस्थिती या उमेदवारांवर आहे. शिंदेंनी हेलिकॉप्टरने या उमेदवारांना एबी फॉर्म पोहोचविले होते. अशातच श्रीरामपूरच्या उमेदवाराने एकनाथ शिंदेंची सभा आयोजित केली होती. परंतू ऐनवेळी शिंदेंनी ही सभा रद्द केल्याने उमेदवार अत्यवस्थ झाला आहे. या उमेदवाराला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे. 

श्रीरामपूर मतदारसंघात शिंदे गटाकडून भाऊसाहेब कांबळे तर अजित पवार गटाकडून लहू कानडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदे हे कांबळेंसाठी आज सभा घेणार होते. परंतू, अचानक ही सभा रद्द करण्यात आली. शिंदे येणार नसल्याने कांबळे यांचा रक्तदाब वाढला आणि ते अत्यवस्थ झाले. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मात्र कानडे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सभा घेत आहेत. कानडेंसाठी तटकरे यांनी सभा घेतली आहे. शिंदे यांनी श्रीरामपूरमधील सभा रद्द केली असली तरी शेजारीच असलेल्या नेवासामध्ये त्यांची सभा होत आहे. यामुळे ही सभा रद्द करण्यामागचे कारण काय, याची चर्चा रंगली आहे. शिंदेंनी सभा रद्द केल्याचे समजताच कांबळेंचा रविवारी रात्रीच रक्तदाब वाढला. यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

कांबळे यांनी यावरून राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका केली आहे. जिल्ह्यातील काही नेत्यांचा माझ्यावर दबाव आहे. मला उमेदवारी देणारे हेच लोक आणि मागे घ्यायला लावणारे हेच लोक आहेत, असे कांबळे म्हणाले आहेत. माझ्या पक्षाने उमेदवारी मागे घेण्यास सांगितले असते तर घेतली असती, पण आता मी ही निवडणूक लढविणार आहे, असे ते म्हणाले. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. 

Web Title: Maharashtra Assembly Vidhan Sabha Election: Given ticket against Ajit Pawar's candidate, Eknath Shinde cancels rally on time; Shivsena candidate bhausaheb Kamble at the hospital high blood pressure shrirampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.