शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

मी छत्रपती शिवरायांची शपथ घेतलीय, मराठा समाजाला आरक्षण देणार; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 18:29 IST

'मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार सकारात्मक आहे.'

नागपूर: नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session) चालू आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा आरक्षणाविषयी निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा पुनरुच्चार केला. 'आरक्षण हा मराठा समाजाचा हक्क आहे, ते देण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मराठा समाजाला कायद्याने टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे,' असं मुख्यमंत्री म्हणाले.     

obc समाजाला धक्का लागणार नाहीएकनाथ शिंदे पुढे म्हणतात, 'मुख्यमंत्री म्हणून माझ्यासाठी सर्व जाती समान आहेत. आरक्षण मराठा समाजाचा (Maratha Reservation) अधिकार आहे. आरक्षणाविषयी सरकारची भूमिका ही सकारात्मक आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी सरकारची पहिल्या दिवसापासून भूमिका आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचा काही लोकांनी गैरफायदा घेऊ नये, याचा विचार सर्वांनाच करावा लागेल.' 

जरांगे पाटलांना आवाहन...'राज्यात समाजिक शांतता आणि बंधूभाव टिकला पाहिजे. राज्यात कायदा-सुव्यवस्था राखली जावी, याची जबाबदारी सर्वांची आहे. सरकार या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहातेय. मुख्यमंत्री म्हणून राज्यातील सर्व समाजाल शांततेचे आवाहन करतो. चर्चेतून मार्ग निघू शकतो, हे आपण बघितलंय. मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्यासाठी मी स्वतः अंतरवाली सराटीला गेलो होते. कुणबी नोंदींसंदर्भातील त्यांची मागणी होती, त्याला आमचा विरोध नाही. मराठा समाजाच्या नोंदी सापडत असतील तर त्यांना प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे. जरांगे पाटलांना आवाहन करतो की, त्यांनी सरकारच्या भूमिकेकडे लक्ष द्यावे. सरकार म्हणून आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.' 

कुणीही राजकीय पोळी भाजू नयेमुख्यमंत्री पुढे म्हणतात, 'मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार सकारात्मक आहे. आरक्षणासाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे. जो समाज अडचणीत आहेत, त्यांच्यामागे उभे राहण्याचे आपले काम आहे. इतर समाजावर अन्याय होऊ देणार नाही. जेव्हा मी शपथ घेतो ती पूर्ण करतो, हे मागच्या दीड वर्षात आपण पाहिलेलं आहे. काहीजण या आंदोलनाचा गैरफायदा घेत आहेत. या आंदोलनावरुन राजकीय पोळी भाजण्याचा कुणीही प्रयत्न करु नये,' असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलnagpurनागपूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनOBC Reservationओबीसी आरक्षण