मुंबई : मराठा आरक्षणासाठी आज क्रांती दिनाचं औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे वगळता राज्यभर बंदची हाक देण्यात आली आहे. शांतता, अहिंसेच्या मार्गाने हा बंद पाळण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी ९ ऑगस्ट रोजी क्रांतीचं औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली होती. यानंतर गेल्या दोन वर्षात मराठा समाजानं आरक्षणासाठी राज्यभरात 58 मोर्चे काढले. मात्र अद्यापही आरक्षण न मिळाल्यानं आज मराठा समाजानं 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.
Live Updates:
आज दिवसभरातील मराठा आंदोलनात काही ठिकाणी हिंसाचार घडून आला. तर अनेक जिल्ह्यात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. दरम्यान, संध्याकाळी 7 नंतर परिस्थीती पूर्वपदावर आली आहे.
5.45 PM पुणे - खंडूजी बाबा चौकात आंदोलन सुरू, सुमारे दीड तासापासून रास्तारोको, आंदोलकांची रस्त्यावर बसकण मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात
5.40 PM - पुणे कलेक्टर ऑफिसजवळी आंदोलन मागे,
5.30 PM - पुण्याच्या चांदणी चौकातील परिस्थीती नियंत्रणात, मुबंई पुणे एक्सप्रेस वेची वाहतूक सुरू
5.30 PM - बाहेरच्या लोकांनी हिंसा केली - कोंढरे
04:25 PM- चांदनी चौक परिसरात पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार04:05 PM- चांदनी चौक परिसरात आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक03.47 PM- पुण्यातील चांदणी चौक परिसरात आंदोलनाला हिंसक वळण03:17 PM- जळगावात राष्ट्रगीत गाऊन आंदोलनाची सांगता02:54 PM- नांदेडच्या उमरी रेल्वे स्थानकात तोडफोड02:40 PM- लोणीत मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा02:30 PM- वाशिमच्या प्रत्येक बस थांब्यावर पोलीस तैनात02:18 PM- औरंगाबाद एमआयडीसीमध्ये पोलिसांची गाडी जाळली02:10 PM- बुलढाणा: मेहकर येथे आमदार डॉ. संजय रायमूलकर यांनी मुंडन करून दिला आंदोलनाला पाठिंबा02:03 PM- नाशिकमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; दुकानांवर दगडफेक01:55 PM- रिसोड येथील व्यापाऱ्यांनी पाळला शंभर टक्के बंद 01:46 pm- नाशिकमध्ये आंदोलनादरम्यान मोर्चेकऱ्यांची राजकीय नेत्यांना धक्काबुक्की01:39 PM- लातूर : माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख मराठा आंदोलनात सहभागी01:30 PM- परभणी : पूर्णा-औरंगाबाद मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबवली01:23 PM- अहमदनगर : इंडियन सिमलेस कंपनीवर दगडफेक, कंपनी बंद न केल्याने अांदोलक संतापले01:15 PM- अमरावतीच्या तहसील कार्यालयासमोर मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी01:08 PM- बुलडाणा जिल्ह्यात कडकडीत बंद12:54 PM- अहमदनगर: एमअायडीसीतील कामगारांचा बंद12:41 PM- अहमदनगरमधील जामखेड शहरात आंदोलन12:29 PM- जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाच्या कार्यकर्त्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न12:14 PM- भायखळा परिसरात कडकडीत बंद; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात11:57 AM- गाेवा हायवे बंद; महाडला वाहनांच्या रांगा11:49 AM- सोलापूरातील संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकाकडून रक्ताभिषेक11:41 AM- यवतमाळच्या बस स्टँड चौकात मराठा मोर्चेकऱ्यांची घोषणाबाजी11:34 AM- कल्याण तहसील कार्यालयाबाहेर मराठा समाजातर्फे ठिय्या आंदोलनाला सुरुवात11:27 AM- चाकणमधील बहुतेक मोबाईल कंपन्यांच्या इंटरनेट सेवा बंद आहेत11: 19 AM- चिपळूण तालुक्यात कडकडीत बंद11:10 AM- शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर सकाळी 9 पासून मराठा समाजाचा ठिय्या11:11 AM- चाकणला कडकडीत बंद, महामार्गावर शुकशुकाट11:03 AM- नांदेडमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद