शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्र बँक अपहार : ६ जणांविरुद्ध गुन्हे

By admin | Published: April 06, 2017 3:15 AM

सहा आरोपी विरोधात फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कलाम ६६ (क) व (डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे

हितेन नाईक,पालघर- येथील महाराष्ट्र बँकेच्या दोन शाखे मधून ५५ लाख १० हजाराच्या वर रक्कम यूपीआय सिस्टम प्रणालीने आॅनलाइन ट्रान्सफर होऊन मोठा घोटाळा केल्याप्रकरणी पोलिसांनी येथील सहा आरोपी विरोधात फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कलाम ६६ (क) व (डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. लोकमतने या फसवणूकीचे बिंग प्रथम फोडले होते.नोटा बंदी नंतर कॅशलेस व्यवहारासाठी रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार नॅशनल पेमेंट कॉर्पोशन आॅफ इंडिया (एनपीसीआय) ने बँकांच्या विविध आॅनलाइन अ‍ॅप्स जनसुविधेसाठी व कॅशलेस व्यवहारासाठी अमलात आणले होते. ह्या नुसार बँकेच्या या अ‍ॅप्सद्वारे कुठेही जलदरीत्या पैसे पाठविण्याची आॅनलाइन प्रणाली ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली होती. महाअ‍ॅपचा गैरवापर करून येथील महाराष्ट्र बँकेतील ५५ लाख १० हजाराची रक्कम जतीन ज्ञानेश्वर संखे, अजमल हारून शेख, नाबिलाल कासीम शेख, प्रदीपकुमार रामदास गौतम, किसन गणपत हमद, उमाशंकर युवेश्वर पासवान या ग्राहकांच्या खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पालघर पोलिसांनी या सहाही विरोधात गुन्हा दाखल केला आहे.छोट्याशा चुकीमुळे महाराष्ट्र बँकेला इतका मोठा भुर्दंड सोसावा लागत असल्याचे प्राथमिक स्तरावरून दिसून येत आहे. आपल्या खात्यात ट्रान्सफर केलेले हे पैसे त्या ग्राहकांनी बँकेला न कळवता खर्च केले. आपल्या खात्यात जमा झालेले हे पैसे आपले नाहीत असे बँकेला कळवून ते परत करणे गरजेचे असतांना त्यांनी ते काढून वापरल्याने आता ते त्यांच्याकडून कसे वसूल करायचे असा प्रश्न बँकेला पडला होता. त्या रक्कमा वसूल करता याव्यात यासाठी महाराष्ट्र बँकेच्या मुख्य कार्यलयाद्वारे अशा ग्राहक आणि अन्य दोषी विरोधात कारवाई करण्यासाठी बँकेचे शाखा व्यवस्थापक जेम्स परेरा यांनी पालघर पोलिसा कडे तक्र ार केली होती. अशा तांत्रिक चुका या आधीही औरंगाबाद, ठाणे, पुणे तर पालघर जिल्ह्यातील विरार आणि वालीव पोलीस स्टेशन अंतर्गत नोंदविण्यात आल्याची माहिती ह्या प्रकरणातील तपास अधिकारी संजय हजारे यांनी लोकमतला दिली. >आज मुंबईत सायबर शाखेत महत्वाची बैठकया प्रकरणातील बँकेचे पैसे हडप करणाऱ्या दोषीं विरोधात चौकशी करून पालघर पोलीसानी कारवाई करण्याची मागणी नागरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश दहिवले यांनी केली होती.या प्रकरणाची योग्य उकल व्हावी ह्यासाठी उद्या मुंबईच्या सायबर गुन्हे शाखेत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असून राज्यातील ज्या पोलीस स्टेशन मध्ये असे गुन्हे दाखल झाले आहेत. त्या सर्व तपास अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले आहे. बँकेच्या पालघर शाखेतून सर्व तपशील मागविण्यात आले असून त्यानंतर या घोटाळ्यातील दोषींची माहिती पुढे येणार असल्याचे हजारे यांनी लोकमतला सांगितले.