18 Jun, 19 03:39 PM
चालू आर्थिक वर्षात नगरविकास विभागाकरिता एकत्रित ३५ हजार ७९१ कोटी ८३ लक्ष ६८ हजार रु. तरतूद
18 Jun, 19 03:20 PM
अटल अर्थसहाय्य योजनेकरीता रु. ५०० कोटी निधी उपलब्ध
8.37 लक्ष बालकांना आठवडयातून चार वेळा अंडी, केळी, पोषण आहाराअंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या योजनेकरीता साधारण रु.140 कोटी इतका प्रतिवर्ष खर्च करण्यात येत आहे. सहकारी संस्थाच्या नाविण्यपुर्ण प्रकल्पांशी संबंधित अटल अर्थसहाय्य योजनेकरीता रु. ५०० कोटी निधी उपलब्ध
18 Jun, 19 03:18 PM
धनगर समाजातील बेघरांसाठी 10 हजार घरकूल बांधून देणार
धनगर समाजाच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने शासन वचनबध्द. आदिवासी समाजाच्या उन्नतीकरिता ज्या योजना राबविल्या जातात त्याच धर्तीवर धनगर समाजाच्या विकासासाठी विविध 22 योजना राबविण्याचा शासनाचा मानस आहे. यात प्रामुख्याने भटकंती करणाऱ्या भूमिहीन मेंढपाळ कुटूंबासाठी अर्धबंदिस्त, बंदिस्त मेंढीपालनासाठी जागा उपलब्ध करुन देणे किंवा जागा खरेदीसाठी अनुदान तत्वावर अर्थसहाय्य देण्याचे तसेच मेंढयांसाठी विमा संरक्षण प्रस्तावित केलेत. याशिवाय या समाजातील बेघरांना पहिल्या टप्प्यात 10 हजार घरकूल बांधून देणे व अन्य काही विशेष सुविधा उपलब्ध करुन देवून धनगर समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा दृढसंकल्प. यासाठी रु.1 हजार कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. सदरची तरतूद राज्याच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातून करण्यात येत असून त्यामुळे आदिवासी विकास विभागासाठी राखून ठेवलेल्या नियतव्ययावर कोणताही परिणाम होणार नाही
18 Jun, 19 03:16 PM
ओबीसी मुलींसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय
इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) 18 आणि मुलींसाठी 18 अशी एकूण 36 वसतीगृहे सुरु करण्यास मान्यता. याकरीता सन 2019-20 या वर्षात रु.200 कोटी इतका नियतव्यय राखून ठेवलेला आहे. इयत्ता 5 वी ते 10 वीत शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील मुलींसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय, या योजनेंतर्गत इयत्ता 5 वी 7 वी पर्यंतच्या विद्यार्थीनींना दरमहा रु.60 तर इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थीनींना दरमहा रु.100 याप्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार. या योजनेचा लाभ डीबीटीव्दारे 2 लक्ष 20 हजार विद्यार्थीनींना होणार आहे
18 Jun, 19 03:14 PM
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेतील अर्थसहाय्यात वाढ
सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकरिता रु.10 हजार 581 कोटी 79 लक्ष 51 हजार तरतूद प्रस्तावित, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाकरिता रु.3 हजार 980 कोटी 87 लक्ष 12 हजार तरतूद प्रस्तावित केलेत. वृध्द, निराधार, दिव्यांग व विधवा या सर्व दुर्बल घटकांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेअंतर्गत सध्या दरमहा मिळत असलेल्या रु.600 इतक्या अर्थसहाय्यावरुन रु.1000 इतके अर्थसहाय्यात वाढ करण्यात येत आहे
18 Jun, 19 03:09 PM
राज्यात फिरते पशु वैद्यकीय चिकित्सालय स्थापन करणार
18 Jun, 19 03:06 PM
धनगर समाजाच्या कल्याणासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद
धनगर समाजाच्या कल्याणासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद मात्र त्यासाठी आदिवासी विभागाच्या बजेटला धक्का लागणार नाही स्वतंत्रपणे तरतूद करणार, अल्पसंख्यांक समाजाच्या महिला कल्याणासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद मालेगाव येथे आयटीआय सुरू करणार
18 Jun, 19 03:00 PM
ओबीसी मुलांच्या वसतिगृहासाठी 200 कोटींची तरतूद
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद, विधवा परितक्त्यांच्या स्वयंरोजगारासाठी योजना बनवणार, अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षासाठी 100 कोटी तर ओबीसी मुला-मुलींच्या वसतिगृहाची बांधणी करण्याकरता दोनशे कोटी रुपयांची तरतूद, 36 वसतिगृहे बांधण्याचा निर्धार
18 Jun, 19 02:56 PM
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे सार्वजनिक बस वाहतुकीचा कणा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मार्ग महामंडळास 700 बस खरेदी करण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय.2018-19 या आर्थिक वर्षात रु.50 कोटी एवढा निधी दिला, सन 2019-20 या आर्थिक वर्षात रु.160 कोटी इतके अनुदान देणार. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे सार्वजनिक बस वाहतुकीचा कणा मागील 3 वर्षात 129 बसस्थानकांच्या आधुनिकीकरणाचे प्रस्ताव असून त्यापैकी 39 कामे पूर्ण. 70 बसस्थानकांची कामे प्रगतीपथावर. या नुतनीकरणाच्या कामाकरीता रु.136 कोटी 51 लाख इतका खर्च
18 Jun, 19 02:55 PM
अर्थसंकल्पावेळी विधान परिषदेत विरोधकांचा गोंधळ, 10 मिनिटांसाठी सभागृह तहकूब
अर्थसंकल्प फुटल्याचा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा आरोप. सदनात अर्थसंकल्प मांडण्यापुर्वीच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्विटरवर अर्थसंकल्पाबाबत मुद्दे पडत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री, सभागृह नेते चंद्रकांत पाटील आणि अर्थ मंत्र्यांनी माफी मागावी, अशी मुंडेंची मागणी. यावरून झालेल्या गदारोळानंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकरांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले
18 Jun, 19 02:53 PM
येत्या 5 वर्षाच्या कालावधीत 50 हजार शिक्षकांना प्रशिक्षित व प्रोत्साहित करण्याचा कार्यक्रम
शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी येत्या 5 वर्षाच्या कालावधीत 50 हजार शिक्षकांना प्रशिक्षित व प्रोत्साहित करण्याचा कार्यक्रम. त्यासाठी सन 2019-20 या आर्थिक वर्षात रु.10 कोटी नियतव्यय राखून ठेवण्यात आला आहे. सर जे.जे. कला, वास्तुशास्त्र आणि उपयोजित कला महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांकरिता रु.150 कोटी इतका निधी देण्याचा निर्णय. त्यापैकी सन 2019-20 या आर्थिक वर्षा करिता रु.25 कोटीची तरतूद तर विभागीय व जिल्हा क्रीडा संकुलाचा कायापालट.यासाठी शासनामार्फत रु.300 कोटी खर्च करण्याचे प्रस्तावित असून त्यापैकी रु.150 कोटी चालू वर्षात उपलब्ध करुन देणार
18 Jun, 19 02:46 PM
तीर्थक्षेत्रातील सर्व बस स्थानकाच्या नुतनीकरणासाठी 100 कोटींची तरतूद
राज्यात उभारणार जय मल्हार व्यायामशाळा, सरपंच मानधन वाढीसाठी 200 कोटी, एसटी महामंडळासाठी बसस्टँड उभारणीसाठी 136 कोटी देण्यात आले आहेत. तीर्थक्षेत्रातील सर्व बस स्थानकाच्या नुतनीकरणासाठी 100 कोटींचा निधींची तरतूद
18 Jun, 19 02:42 PM
2022 पर्यंत शिवडी न्हावा शेवा- मुंबई महामार्ग तयार होणार
22 कि.मी. लांबीच्या शिवडी न्हावा शेवा-मुंबई पारबंदर या प्रकल्पाची रु.17 हजार 843 कोटी किंमत असून कामास मार्च 2018 पासून सुरुवात. हा प्रकल्प सप्टेंबर 2022 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग 10 जिल्हे 26 तालुके व 390 गावांमधून जाणार असून यावर सुमारे रु.55 हजार 335 कोटी इतका खर्च अपेक्षित. सदर महामार्गाचे काम 1 जानेवारी 2019 रोजी सुरु. बांधकामाचे 16 पॅकेजेसमध्ये नियोजन.14 पॅकेजेसचे कार्यारंभ आदेश. जलदगतीने काम सुरु
18 Jun, 19 02:38 PM
60 लाख नवीन रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट
7 मार्च 2019 रोजी महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण जाहिर. राज्याला जागतिक स्तरामध्ये गुंतवणुकीचे उत्पादनाचे केंद्र बनवून 10 लाख कोटी गुंतवणुक आकर्षित करुन त्यातून 60 लाख नवीन रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट
18 Jun, 19 02:37 PM
कृषी सिंचन योजनेसाठी 2 हजार 720 कोटींची तरतूद
कृषी सिंचन योजनेसाठी 2 हजार 720 कोटींची तरतूद, गेल्या 4 वर्षात 140 सिंचन योजना पुर्ण करण्यात आल्या
18 Jun, 19 02:35 PM
गोवर्धन गोवंश सेवा केंद्र’ योजनेच्या व्याप्तीत वाढ
गोवर्धन गोवंश सेवा केंद्र’ या योजनेत आतापर्यंत 17 कोटी रुपयांएवढा निधी खर्च, योजनेच्या व्याप्तीत वाढ
18 Jun, 19 02:31 PM
राज्यातील २६ अपुर्ण सिंचन प्रकल्पांचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश
राज्यातील २६ अपुर्ण सिंचन प्रकल्पांचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश, सदर प्रकल्पांची उर्वरित किंमत २२ हजार ३९८ कोटी असून त्यापैकी ३ हजार १३८ कोटी केंद्रीय अर्थसंकल्प प्राप्त होणार.
18 Jun, 19 02:28 PM
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेला निधी कमी पडू देणार नाही - मुनगंटीवार
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 ची राज्यात अंमलबजावणी सुरु आहे. सद्यस्थितीत 50.27 लाख खातेदारांसाठी रु.24 हजार 102 कोटी मंजूर. सदर योजनेचा लाभ अधिक लाभार्थ्यांना व्हावा यासाठी योजनेच्या व्याप्तीत वाढ, या योजनेत खावटी कर्जाचा समावेश. तांत्रिक किंवा तत्सम इतर कारणामुळे या योजनेसाठी यापूर्वी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याकरिता शासन लवकरच निर्णय घेणार, शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीसाठी शासन कटिबध्द असून शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत शासनाकडून या योजनेसाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही
18 Jun, 19 02:26 PM
आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगास मान्यता
सन २०१९ च्या मान्सून कालावधीत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगास मान्यता देण्यात आली आहे.
18 Jun, 19 02:25 PM
काजू उत्पादनात महाराष्ट्र देशात अग्रेसर
काजू प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद, प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी अनेक योजना जाहीर, काजू उत्पादनात महाराष्ट्र देशात अग्रेसर
18 Jun, 19 02:23 PM
4 कृषी विद्यापीठांना 600 कोटी रुपयांची तरतूद
गोपीनाथ मुंडे विमा योजनेत शेतकऱ्यांच्या कुटुंबाचाही समावेश करण्यात येणार, दुष्काळी भागात मागेल त्याला शेततळे देण्याचा निर्णय. चार कृषी विद्यापीठांना 600 कोटी रुपयांची तरतूद
18 Jun, 19 02:20 PM
8946 कोटी रुपये निधी जलयुक्त शिवार योजनेत खर्च
8946 कोटी रुपये निधी जलयुक्त शिवार योजनेत खर्च, 260 सुधारित सिंचन प्रकल्पाची कामं प्रगती पथावर, सिंचन प्रकल्प पुर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधी देण्यात येईल
18 Jun, 19 02:18 PM
नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ रु.6 हजार 410 कोटी एवढी तरतूद
2019 च्या मान्सून कालावधीत अनुकूल वातावरणाचा उपयोग करुन पर्जन्यवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगास मान्यता. नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ रु.6 हजार 410 कोटी एवढी तरतूद. आवश्यकता भासल्यास अतिरिक्त निधी देणार - सुधीर मुनगंटीवार
18 Jun, 19 02:16 PM
पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई नियंत्रण क्षेत्राची स्थापना
पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई नियंत्रण क्षेत्राची स्थापना, शेळ्या आणि मेंढ्यांसाठी चारा छावण्यांची निर्मिती, कृषी सिंचन योजनेसाठी 2 हजार 720 कोटींची तरतूद, गेल्या 4 वर्षात 140 सिंचन योजना पुर्ण करण्यात आल्या आहेत.
18 Jun, 19 02:14 PM
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
बळीराजा जलसंजीवनी योजनेकरीता सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरीता रु. 1 हजार 531 कोटी एवढी भरीव तरतूद करण्यात आली आहे. जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीज देयकात 33.5 टक्के सुट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्याकरीता टँकरद्वारे पाणीपुरवठा, टंचाई जाहिर केलेल्या गावात शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे हे विशेष निर्णय घेतले आहेत.
18 Jun, 19 02:12 PM
शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद, दुष्काळ निवारणासाठी मोठं काम
राज्यातील 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. चारा टंचाईवर मात करण्यासाठी 30 हजार हेक्टर जमीन करारावर दिली आहे. लघु सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आल्या आहेत.
18 Jun, 19 02:10 PM
शेतीशी निगडीत कर्जवसुलीला स्थगिती
28,524 गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. चारा छावण्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. 1 हजार 635 चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत - सुधीर मुनगंटीवार
18 Jun, 19 02:06 PM
केंद्राकडून दुष्काळ निवारणासाठी 4 हजार 563 कोटी रुपये
केंद्र सरकारकडून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्याला मोठी मदत मिळाली. राज्यात पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली, टंचाईग्रस्त भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाला - सुधीर मुनगंटीवार
18 Jun, 19 01:46 PM
अर्थसंकल्पावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंची उपस्थिती
राज्य सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प आज सादर होत आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार थोड्याच वेळात अर्थसंकल्प मांडतील. अर्थसंकल्पावेळी विधानसभेच्या गॅलरीत शिवसेना नेते आदित्य ठाकरेदेखील उपस्थित आहेत.
18 Jun, 19 12:13 PM
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार दुपारी 1.45 मिनिटांनी सादर करणार राज्याचा अर्थसंकल्प
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार दुपारी 1.45 मिनिटापासून राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. तत्पूर्वी सोमवारी अर्थमंत्र्यांनी राज्याचा 2018-19 चा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर केला.
18 Jun, 19 12:23 PM
आर्थिक पाहणी अहवाल दिशाभूल करणारा - पृथ्वीराज चव्हाण
राज्यातील आर्थिक पाहणी अहवालातील परस्पर विसंगत आणि फुगवलेली आकडेवारी पाहता हा आर्थिक दिशाभूल अहवाल करणारा आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
18 Jun, 19 12:15 PM
आर्थिक पाहणी अहवालातील आकडे संशयास्पद - धनंजय मुंडे
आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी संशयास्पद असून ती तपासून पाहण्यासाठी दोन्ही सभागृहाच्या सर्वपक्षीय सदस्यांची समिती नेमावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. आर्थिक पाहणी अहवालात सरकारकडून सादर करणारी आकडेवारी संशयास्पद असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.