महाराष्ट्र बजेट 2020 Live: अर्थमंत्र्यांच्या 'त्या' घोषणेनंतर सगळ्या आमदारांनी वाजवले बाक
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 10:37 AM2020-03-06T10:37:33+5:302020-03-06T11:57:29+5:30
Maharashtra Budget 2020 Live थोड्याच वेळात अर्थमंत्री महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार
मुंबई: महाविकास आघाडी सरकारचा पहिलावहिला अर्थसंकल्प थोड्याच वेळात सादर होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प सादर करतील. त्यासाठी ते विधिमंडळ परिसरात दाखल झाले असून त्यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतले. राज्यावरील वाढलेला कर्जाचा बोजा, घटलेली परकीय गुंतवणूक, दरडोई उत्पन्नात झालेली घसरण या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं सरकार सर्वसामान्यांना कसा दिलासा देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
LIVE
12:08 PM
पुणे, नागपूर महापालिका क्षेत्रात मुद्रांक शुल्कात १ टक्क्यानं कपात- अर्थमंत्री
12:07 PM
एमएमआरडीए क्षेत्रातला मुद्रांक शुल्क १ टक्क्यानं कमी करणार- अर्थमंत्री
12:06 PM
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन निधी- अर्थमंत्री
Maharashtra Budget 2020 : 'नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही 50 हजार प्रोत्साहन निधी' #MaharashtraBudget2020https://t.co/CDvkpwcPR9
— Lokmat (@MiLOKMAT) March 6, 2020
12:04 PM
शिवभोजन थाळींची संख्या दुप्पट करणार- अर्थमंत्री
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 6, 2020
12:02 PM
अर्थमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 6, 2020
12:01 PM
शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी २२ हजार कोटींची तरतूद
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 6, 2020
11:58 AM
विकासनिधी वाढवल्यानं आमदारांनी वाजवले बाक
11:56 AM
आमदारांना विकासकामांसाठी मिळणारा निधी २ कोटींवरून कोटींवर- अर्थमंत्री
11:53 AM
पर्यटन विभागासाठी 1200 कोटी- अर्थमंत्री
11:44 AM
प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी विशेष पोलीस ठाणे; तिथल्या सर्व कर्मचारी महिला असतील- अर्थमंत्री
11:41 AM
प्रत्येक हाताला काम देण्याचा सरकारचा निर्धार- अर्थमंत्री
11:37 AM
बेरोगजारी वाढली, आव्हानं वाढली, मात्र इच्छाशक्तीच्या जोरावर समस्यांवर मात करू- अर्थमंत्री
11:30 AM
ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरवण्यावर भर- अर्थमंत्री
11:29 AM
शेतकरी कर्जमाफीसाठी २२ हजार कोटी रुपये- अर्थमंत्री
11:29 AM
जुन्या रुग्णवाहिका येत्या दोन वर्षांत पूर्णपणे बदलणार- अर्थमंत्री
11:29 AM
पुणे मेट्रोला गेल्या पाच वर्षांत मिळालेल्या निधीपेक्षा अधिक निधी देणार- अर्थमंत्री
11:28 AM
ऊसासह इतर पिकांसाठी ठिबक सिंचनासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना ८० टक्के अनुदान- अर्थमंत्री
11:18 AM
शेतीसाठी दिवसा पाणी पुरवठा करण्यावर भर- अर्थमंत्री
11:14 AM
केंद्राकडून राज्याला जीएसटीतला वाटा मिळण्यास विलंब- अर्थमंत्री
11:10 AM
आर्थिक मंदीमुळे उद्योगधंदे अडचणीत; कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर तणाव- अर्थमंत्री
11:00 AM
सरकारकडून फार अपेक्षा नाहीत. यांनी केवळ सर्व निर्णयांना, प्रकल्पांना स्थगिती देण्याचं काम केलंय- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
10:52 AM
अर्थसंकल्पाआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू
10:49 AM
अर्थसंकल्प अनेकांना न्याय देणारा, सर्वांना सोबत नेणारा असेल- बाळासाहेब थोरात
10:48 AM
ठाकरे सरकार जनतेला न्याय देऊ शकत नाही; त्यामुले त्यांच्याकडून आम्हाला विशेष अपेक्षा नाही : मुनगंटीवार