Maharashtra Budget 2021: आमदारांची साद अन् अजित पवारांचा प्रतिसाद; 'या' चार जिल्ह्यांसाठी मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 02:52 PM2021-03-08T14:52:22+5:302021-03-08T14:52:48+5:30

Maharashtra Budget 2021: FM Ajit Pawar announces medical colleges for 4 districts - महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प; अर्थमंत्री अजित पवारांकडून महत्त्वाच्या घोषणा

Maharashtra Budget 2021 FM Ajit Pawar announces medical colleges for 4 districts | Maharashtra Budget 2021: आमदारांची साद अन् अजित पवारांचा प्रतिसाद; 'या' चार जिल्ह्यांसाठी मोठी घोषणा

Maharashtra Budget 2021: आमदारांची साद अन् अजित पवारांचा प्रतिसाद; 'या' चार जिल्ह्यांसाठी मोठी घोषणा

Next

मुंबई: आमच्या जिल्ह्याला धरण द्या, अशी मागणी गेल्या वर्षापर्यंत अर्थसंकल्पापूर्वी (Maharashtra Budget 2021) आमदारांकडून केली जायची. मात्र कोरोनामुळे परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला आहे. आमच्या जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय द्या, अशी मागणी अर्थमंत्री अजित पवारांकडे (Finance Minister Ajit Pawar) अनेक आमदारांनी केली होती. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभाग १२ जिल्ह्यांमध्ये महाविद्यालयं सुरू करण्याच्या प्रस्तावावर काम करत होता. अखेर अजित पवारांनी अर्थसंकल्पात ४ राज्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयं उभारणार असल्याची घोषणा केली. (Ajit Pawar announces medical colleges for 4 districts)

"महाराष्ट्र संकटापुढे कधीही झुकला नाही"; सरकारकडून आरोग्य विभागासाठी ७ हजार ५०० कोटी रूपयांची तरतूद 

सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालयं उभारणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली. कोरोना संकटात आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. राज्यात आरोग्य सेवांसाठी ७,५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नागरी आरोग्य कार्यालयाची निर्मिती करणार येणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. सातारा, सिंधुदुर्ग आणि अलिबागमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालयं तयार करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राकडे पाठवलं आहे.

राज्याच्या बजेटमध्ये अजित पवारांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा एका क्लिकवर

आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होत आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अशा वेळी मोठ्या खर्चाला कात्री लागण्याची शक्यता आहे. पण जनतेला काय दिलासा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गेल्या वर्षी अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा ९,५०० कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मांडला होता. 

अर्थमंत्री अजित पवारांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा-
सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालयं उभारणार 
कोरोना संकटात आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद
राज्यात आरोग्य सेवांसाठी ७ हजार ५०० कोटींची तरतूद
कर्जमुक्तीनंतर ४२ हजार कोटी रुपयांचं पीक कर्ज शेतकऱ्यांना देण्यात आलं
कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी १५०० कोटींचा महावितरणला निधी
विकेल ते पिकेल योजनेला २१०० कोटी 
कृषी संशोधनासाठी विद्यापीठांना दरवर्षी २०० कोटी रुपयांची तरतूद 
जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांना १२ हजार ९१९ कोटींचा निधी 
जलसंधारण विभागासाठी २ हजार ६० कोटींचा निधी प्रस्तावित 
गोसीखुर्द प्रकल्पासाठी १ हजार कोटींची तरतूद, महत्वाच्या १२ धरणांच्या बळकटीसाठी ६२४ कोटी
ग्रामविकास विभागासाठी ७ हजार ३५० कोटींचा निधी प्रस्तावित

Web Title: Maharashtra Budget 2021 FM Ajit Pawar announces medical colleges for 4 districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.