Maharashtra Budget 2022: पुण्यात ३०० एकरवर उभारणार इंद्रायणी मेडिसिटी; अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 02:50 PM2022-03-11T14:50:50+5:302022-03-11T14:51:30+5:30

Maharashtra Budget Live Session: या अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्य विभागासाठी ३ हजार १८३ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहे.

Maharashtra Budget 2022: Indrayani Medicity to be set up on 300 acres in Pune; Finance Minister Ajit Pawar's announcement | Maharashtra Budget 2022: पुण्यात ३०० एकरवर उभारणार इंद्रायणी मेडिसिटी; अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा

Maharashtra Budget 2022: पुण्यात ३०० एकरवर उभारणार इंद्रायणी मेडिसिटी; अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा

googlenewsNext

मुंबई – राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी राज्याचा २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर केला. गुरूवारी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. कृषी क्षेत्राने कोरोनाच्या कठीण काळात दिलेला हात यंदा मात्र जरा आखडता घेतला. तर निर्बंध हटल्यानंतर परत भरारी घेत उद्योग व सेवा क्षेत्राने राज्याच्या प्रगतीला बळ दिल्याचे चित्र २०२१-२२ च्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे. या अर्थसंकल्पात अजित पवारांनीआरोग्य क्षेत्रासाठी ११ हजार कोटींच्या निधी देणार असल्याचं सांगत पुण्यात ३०० एकरवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार असल्याची घोषणा केली.

यातच अजित पवारांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अजित पवारांनी सांगितले की, कोविड काळात राज्यात झालेल्या कामाचं देशभरात कौतुक केले. कोविड काळात अनेक योद्धे सक्षमपणे लढा देत होते. माझे कुटुंब, माझी जबाबादारी अंतर्गत ८ कोटी ७४ लोकांना कोविडच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. राज्यात १५ लाख ८७ हजार नागरिकांना कोरोना लसीचा बुस्टर डोस दिला आहे. राज्यात नांदेड, अमरावती, जालना, सातारा, भंडारा प्रथम श्रेणीतील ट्रॉमा सेंटर उभारण्यासाठी १८ कोटींचा निधी उपलब्ध करून देणार आहे. राज्यातील आरोग्य क्षेत्रातील सुविधांसाठी ११ हजार कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली.( Maharashtra Budget 2022 Speech)

राज्यात या अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्य विभागासाठी ३ हजार १८३ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहे. टाटा कॅन्सर संशोधन केंद्राला रायगड जिल्ह्यात खानापूरमध्ये जमीन देण्यात येणार आहे. शिवआरोग्य जिल्हा योजनेतंर्गत प्रत्येक जिल्ह्यात टेलिमेडिसिन रुग्णालय उभारण्यात येणार आहे. ८ कोटी रुपयांची ८ मोबाईल कर्करोग निदान वाहने पुरवणार येतील. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणा राबवणार आहे. त्याचसोबत अकोला येथे स्त्री रुग्णालयाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

अजित पवारांच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

जालना येथे ३६५ खाटांचे मनोरुग्णालय स्थापन करण्यात येणार

ग्रामीण भागातील जनतेसाठी  शिवआरोग्य योजना सुरु करण्यात येणार

प्राथमिक आरोग्य केंद्र,उपजिल्हा रुग्णालय पातळीवर याचा विस्तार करण्यात येणार

पुणे शहराजवळ इंद्रायणी मेडिसीटी उभारण्याचा शासनाचा प्रयत्न असेल

सर्व उपचार पद्धती असलेलं केंद्र निर्माण करण्यात येणार 2061 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार

देशातील होतकरु युवकांना इथेच वैद्यकीय शिक्षण मिळावं म्हणून प्रवेश संख्येत वाढ करण्यात येणार

 

Web Title: Maharashtra Budget 2022: Indrayani Medicity to be set up on 300 acres in Pune; Finance Minister Ajit Pawar's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.