Maharashtra Budget 2022 Live Updates: राज्यात सीएनजी स्वस्त होणार, VAT ३ टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव - अर्थमंत्री

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 11:29 AM2022-03-11T11:29:36+5:302022-03-11T15:36:33+5:30

Maharashtra Budget 2022: आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार २०२२-२३ चा अर्थसंकल्प मांडणार आहेत. यापूर्वी गुरूवारी राज्याचा आर्थिक पाहणी ...

maharashtra budget 2022 Live assembly session cm uddhav thackeray deputy cm ajit pawar devendra fadnavis agriculture economy road transport mumbai pune tourism annual schemes | Maharashtra Budget 2022 Live Updates: राज्यात सीएनजी स्वस्त होणार, VAT ३ टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव - अर्थमंत्री

Maharashtra Budget 2022 Live Updates: राज्यात सीएनजी स्वस्त होणार, VAT ३ टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव - अर्थमंत्री

googlenewsNext

Maharashtra Budget 2022: आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार २०२२-२३ चा अर्थसंकल्प मांडणार आहेत. यापूर्वी गुरूवारी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. कृषी क्षेत्राने कोरोनाच्या कठीण काळात दिलेला हात यंदा मात्र जरा आखडता घेतला. तर निर्बंध हटल्यानंतर परत भरारी घेत उद्योग व सेवा क्षेत्राने राज्याच्या प्रगतीला बळ दिल्याचे चित्र २०२१-२२ च्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे. 
 

LIVE

Get Latest Updates

03:59 PM

आजचा अर्थसंकल्प विकासाच्या दिशेनं टाकलेलं पाऊल - मुख्यमंत्री

राज्याचा आगामी विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प मांडला आहे. गेली दोन वर्ष आपण येणाऱ्या आपत्तींना तोंड देत राज्याच्या विकास पुढे नेण्याचा आपला प्रयत्न आहे. आजचा अर्थसंकल्प विकासाच्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे. जे शक्य आहे ते आम्ही करत आलो आहोत आणि यापुढेही ते करू हे आजच्या अर्थसंकल्पातून सूचित होतंय. हा अर्थसंकल्प सर्वांच्या साक्षीनं आपल्या राज्यातल्या सर्वांचा विकास करणारा, आधार देणार आहे. जनता त्याचं स्वागत केल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पानंतर दिली.

03:34 PM

नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन, नागरिकांना दिलासा; मूल्यवर्धित कर ३ टक्क्यांवर

नैसर्गिक वायूचा घरगुती पाईप गॅस, सीएनजीवर चालणारी वाहने, यात वापर. पर्यावरण पूरक नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन नागरिकांना दिलासा. मूल्यवर्धित कराचा दर १३.५ टक्क्यांवरून ३ टक्के. राज्याच्या तिजोरीत ८०० कोटी रुपयांची महसुली घट

03:27 PM

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे १०० वी पुण्यतिथी वर्ष कृतज्ञता पर्व म्हणून साजरे करणार

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ६ मे रोजी १०० वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने हे वर्ष “कृतज्ञता पर्व” म्हणून साजरे करणार आहोत. त्यानिमित्ताने राज्यात विविध  कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

03:26 PM

मराठी भाषा विभागाला ५२ कोटी

सन २०२२-२३ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरीता मराठी भाषा विभागाला ५२ कोटी, सामान्य प्रशासन विभागाला १ हजार १३९ कोटी, माहिती तंत्रज्ञान विभागाला ७०२ कोटी व माहिती व जनसंपर्क विभागाला २६५ कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.
 

03:20 PM

राज्यात १८ अतिरिक्त न्यायालय, २४ जलदगती न्यायालय निर्माण करणार

राज्यात १८ अतिरिक्त न्यायालय, २४ जलदगती न्यायालय १४ कुटुंब न्यायालये निर्माण करणार. यासाठी आणि नवी न्यायालये निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालय इ गव्हर्नन्स न्यायालय योजनेसाठी निधी देणार.

03:17 PM

सहा किल्ल्यांसाठी १४ कोटी रुपये उपलब्ध करून देणार

रायगड किल्ला आणि आसपासच्या परिसराच्या विकासाठी २०२२-२३ मध्ये १०० कोटी रूपयांचा निधी देण्यात येईल. राजगड, तोरणा, शिवनेरी, सुधागड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या सहा किल्ल्यांसाठी १४ कोटी रुपये आणि मुंबईतील शिवडी आणि सेंट डॉर्ज किल्ल्यांच्या संवर्धन आणि जनत आराखड्यासाठी ७ कोटींचा निधी. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि त्यांचा गनिमी कावा युद्धपद्धती जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यास युनेस्कोकडे प्रस्ताव दाखल करण्यात येतोय.

03:10 PM

२१-२२ मध्ये कोविड नियंत्रणासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून ९०५ कोटी १९ लाख रुपयांचा निधी

मागील दोन वर्षांत राज्यातील जनतेने कोविड, तौक्ते चक्रीवादळ महापूराचा सामना केला. यामध्ये शासन जनतेच्या पाठीशी होतं. माणूसकीच्या भावनेने प्रत्येकाला मदतीचा हात देण्याची जबाबदारी शासनानं निभावली. २०२१-२२ मध्ये कोविड नियंत्रणासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून ९०५ कोटी १९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. कोविडमुळे आईवडिल गमावलेल्या मुलांना ५ लाखांचं आर्थिक साहाय्य. कोविड कर्तव्यावर असताना कोविडमुळे मृत्यू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्यात येते.

03:06 PM

राज्यात अडीच हजार मेगावॅट सौर ऊर्जेचे मेगा पार्क विकसित करण्यात येणार

राज्यात अडीच हजार मेगावॅट सौर ऊर्जेचे मेगा पार्क विकसित करण्यात येणार. मुंबईत पारेषण प्रणाली क्षमतेत वाढ करणं आवश्यक. मुंबईत ११५३० कोटी रुपयांची ४०० किलो व्हॅट क्षमतेची चार उपकेंद्रे आणि १ हजार मेगाव्हॅट क्षमतेचे अतिउच्च दाब वाहिन्यांचा पारेषण प्रकल्प राबवण्यात येईल. 

03:02 PM

'पंडिता रमाबाई महिला उद्योजक योजना' सुरू करणार

विधवा महिलांसाठी पंडिता रमाबाई यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त 'पंडिता रमाबाई महिला उद्योजक योजना' सुरू करणार. कोविडमध्ये विधवा झालेल्या महिलांना स्वयंरोजगारासाठी महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत भांडवलाच्या कर्जावरील व्याजाची १०० टक्के परतफेड करण्यात येईल.

02:59 PM

सन २०२१-२५ यासाठी महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण मंजूर

सन २०२१-२५ यासाठी महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण मंजूर करण्यात आलंय. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत इलेक्ट्रीक वाहनांची नोंदणी १५७ टक्क्यांनी वाढली.  २०२५ पर्यंत नव्या वाहनांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांचा हिस्सा १० टक्के मोठ्या शहरातील वाहतूकीतील हिस्सा २५ टक्के करण्याचं उद्दिष्ट. २०२५ पर्यंत ५ हजार चार्जिंग सुविधांच्या उभारणीचं उद्दिष्ट 

02:56 PM

राज्य वैद्यकीय ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण

कोणतेही राज्य उद्योग क्षेत्राशिवाय समृद्ध होऊ शकत नाही. १४८० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजनची क्षमता आपण निर्माण केली. आता राज्य वैद्यकीय ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण. 

02:51 PM

३ लाख ३० हजार नोकऱ्या निर्माण करण्याचे लक्ष्य

मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत ९८ गुंतवणूक करार. १ लाख ८९ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित. ३ लाख ३० हजार नोकऱ्या निर्माण करण्याचे लक्ष्य

02:47 PM

एमएमआरमधील रस्ते, रेल्वे आणि वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करणार

मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते, रेल्वे आणि वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी वसई, भाईंदर, डोंबिवली, कल्याण, वाशी, ऐरोली, ठाणे, बेलापूर हे जलमार्गानं जोडण्याचा सरकारचा मानस. या ठिकाणी जेट्टी व तत्सम सुविधा आणि खाडीचे खोलीकरण्याची योजना आहे. यासाठी ३३० कोटींचा खर्च अपेक्षित. 

02:47 PM

एसटी महामंडळाला ३ हजार नव्या बसेस देणार

एसटी महामंडळाला ३ हजार पर्यावरणपूरक बसेस देणार. शिवडी न्हावा शेवा सागरीसेतू २०२३ च्या अखेपर्यंत सुरू करणार. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मालवाहतूक टर्मिनल उभारण्याचे प्रस्तावित.  १५० कोटी रुपयांचा निधी.

02:41 PM

क्रीडा विभागाला ३८५ कोटी

शिष्यवृत्ती, फेलोशिप याद्वारे सर्व विभागांच्या योजना लाभार्थ्यांच्या आधार कार्डशी जोडल्या जातील. तरुणांना विशेष संधी निर्माण करुन देण्यासाठी स्टार्ट अपसाठी भांडवल १०० कोटी रकमेचा शासनाचा स्टार्ट अप फंड उभारण्यात येईल.  क्रीडा विभागाला ३८५  कोटी.

02:39 PM

समृद्धी महामार्गचे ७७ टक्के काम पूर्ण

समृद्धी महामार्ग नागपूर ते भंडारा गोंदिया आणि नागपूर गडचिरोली विस्तारित करण्याचे नियोजन. सदर महामार्गाचे ७७ टक्के काम पूर्ण. जालना ते नांदेड दृतगती जोड मार्गासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार.

02:35 PM

शालेय शिक्षण विभागासाठी २,३५४ कोटींची तरतूद - अर्थमंत्री

शालेय शिक्षण विभागासाठी २ हजार ३५४ कोटी रूपयांची तरूतूद करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागासाठी ११ हजार १९९ कोटींची तरतूद. अंगणवाडी सेविकाना मोबाईल सेवा  देणार

02:35 PM

सामाजिक न्याय विभागासाठी २ हजार ८७६ कोटी रुपयांची तरतूद

शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत शौचालये उभारणार.  सामाजिक न्याय विभागासाठी २ हजार ८७६ कोटी रुपयांची तरतूद. आश्रम शाळांसाठी ४०० कोटींचा निधी

02:33 PM

उद्योगांसाठी विशेष सवलत देणार - अजित पवार

होतकरू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी मुंबई, नाशिक आणि नागपूरमध्ये संस्था. नॅनो, जैव तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञानासाठी प्रत्येक महसूल विभागात एक इनोव्हेशन हब उभारणार. उद्योगांसाठी विशेष सवलत देणार. नालेसफाईसाठी स्वयंचलित यंत्रणा स्थापणार. राज्यातील तृतीयपंथींना स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशनकार्ड देणार.

02:26 PM

णे शहरात ३०० एकरवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार - अर्थमंत्री

टाटा कॅन्सर संशोधन केंद्राला रायगड जिल्ह्यात खानापूरमध्ये जमीन. प्रत्येक जिल्ह्यात टेलिमेडिसिन रुग्णालय, ३ हजार १८३ कोटींचा निधी देण्यात येणार आहे.  पुणे शहरात ३०० एकरवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार. सगळ्या उपचार पद्धती एकाच छताखाली मिळणार असल्याची माहिती.

02:26 PM

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी - अजित पवार

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी.  थोर पुरुष यांच्या मूळ गावातील शाळांना १ कोटी चा निधी देणार. थोर समाजसुधारकांच्या नावाने अध्यापन केंद्र सुरू करणार.

02:25 PM

शेततळ्यांच्या अनुदानाच्या रकमेत वाढ - अजित पवार

शेततळ्यांच्या अनुदानाच्या रकमेत वाढ, अन्न प्रक्रिया योजना राबवणार.  विदर्भ, मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल - अर्थमंत्री

02:23 PM

महिला शेतकरी, शेतमजूर सन्मान वर्ष राबवण्यात येणार : अर्थमंत्री

हे वर्ष महिला शेतकरी, शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून राबवण्यात येईल.  आरोग्य सेवांवर ११ हजार कोटी रुपये  खर्च करणार.  ट्रॉमा केअर सेंटर सुरू करणार असल्याची अर्थमंत्र्यांची माहिती.

02:16 PM

कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला प्रत्येकी ५० कोटी

 कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला प्रत्येकी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. : अर्थमंत्री अजित पवार 

02:16 PM

कोविड काळात राज्यातील कामाचं कौतुक झालं - अर्थमंत्री

कोविड काळात राज्यातील कामाचं कौतुक झालं. गेल्या दोन वर्षांपासून कोविडशी लढत आहोत. माझे घर माझे कुटुंब, हर घर दस्तक मोहीम राबवली. राज्यात १५ लाख ८७ हजार नागरिकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस - अर्थमंत्री

02:14 PM

जलसंपदा विभागाला १३ हजार २५२ कोटींची तरतूद

जलसंपदा विभागाला १३ हजार २५२ कोटींची तरतूद.  दोन वर्षांत १०४ सिंचन प्रकल्प पूर्ण करणार - अर्थमंत्री

02:07 PM

नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार अनुदान

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार ऐवजी आता ७५ हजार रुपयांचं अनुदान. कृषी संशोधनासाठी अधिकचा निधी शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प माडंला.

02:07 PM

हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संसोधन केंद्र 

हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संसोधन केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. य़ाशिवाय संभाजीराजे महाराजांचं स्मारक हवेलीमध्ये उभारण्यात येणार आहे. यासाठी २५० कोटींची घोषणा.

01:45 PM

अर्थसंकल्पापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल

अर्थसंकल्पापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले आहे. अर्थमंत्री अजित पवार आणि अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई हेदेखील विधानभवनात दाखल झाले आहेत.

01:08 PM

मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गंत राज्यात १.८८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गंत राज्यात जून २०२० ते डिसेंबर २०२१ या कालावधीत राज्यात १.८८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक. तसंच ३.३४ लाख अपेक्षित रोजगार असलेले प्रस्ताव प्राप्त, आर्थिक पाहणी अहवालातून माहिती समोर

01:08 PM

अर्थमंत्री अजित पवार विधानभवानात दाखल

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि राज्याचे अर्थराज्य मंत्री संभूराज देसाई हे विधानभवनात दाखल झाले आहे. थोड्याच वेळात अजित पवार हे विधानसभेत, तर शंभुराज देसाई हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील.

 

12:25 PM

कोरोनाचे निर्बंध खुले झाल्यावर बांधकाम क्षेत्रात १७.४ टक्के वाढ

कोरोनाचे निर्बंध खुले झाल्यानंतर उद्योग क्षेत्रात ११.९ टक्के तर सेवा क्षेत्रात १३.५ टक्के वाढ झाली. वस्तुनिर्माण व बांधकाम क्षेत्रात अनुक्रमे ९.५ टक्के व १७.४ टक्के वाढ दिसत असल्याचं आर्थिक पाहणी अहवालातून समोर आलं आहे.

12:01 PM

राज्याच्या दरडोई उत्पन्नात यंदा वाढ

राज्याच्या दरडोई उत्पन्नात यंदा वाढ झाली आहे. २०१९-२० मध्ये हे उत्पन्न १ लाख ९६ हजार रुपये तर २०२०-२१ मध्ये ते १ लाख ९३ हजार रुपये इतके होते. यंदा ते २ लाख २५ हजार ७३ रुपये इतके राहील, असा अंदाज आहे.

11:46 AM

ठाकरे सरकार इंधनावरील कर कमी करुन दिलासा देणार?

नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलवरी उत्पादन शुल्क कमी केलं. त्याला आता तीन महिने उलटले, तरी राज्य सरकारनं इंधनावरील कर कमी करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अर्थात राज्याच्या एकूण उत्पन्नात कोरोनाच्या काळाच्या तुलनेत घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नातील ही वाढ वापरुन इंधनावरील कर कमी करुन अजित पवार जनतेला दिलासा देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

संपूर्ण बातमी वाचा

11:31 AM

गुरुवारी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल झाला सादर

कृषी क्षेत्राने कोरोनाच्या कठीण काळात दिलेला हात यंदा मात्र जरा आखडता घेतला. तर निर्बंध हटल्यानंतर परत भरारी घेत उद्योग व सेवा क्षेत्राने राज्याच्या प्रगतीला बळ दिल्याचे चित्र २०२१-२२ च्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा अहवाल गुरुवारी मांडण्यात आला.

Web Title: maharashtra budget 2022 Live assembly session cm uddhav thackeray deputy cm ajit pawar devendra fadnavis agriculture economy road transport mumbai pune tourism annual schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.