शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
2
इराणवरच नाही, तर इस्रायलचा इराकवरही हल्ला; एअर डिफेन्स सिस्टिम उडविल्या, कारण काय? 
3
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
5
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
6
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
8
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-
9
ना ओटीपी, ना पिन, केवळ Aadhaar नंबरद्वारे झटपट काढता येतील पैसे; सोपी आहे पद्धत
10
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
11
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
12
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
13
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
14
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
15
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
16
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
17
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
18
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
19
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
20
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा

Maharashtra Budget 2023 : आशा, अंगणवाडी सेविकांना खूशखबर, मानधनात घसघशीत वाढ, अर्थसंकल्पातून मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 2:46 PM

Maharashtra Budget 2023 Live Updates : राज्यातील हजारो आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका तुटपुंजा मानधनावर काम करत आहेत. अशा आशासेविका आणि अंगणवाडी सेविकांना वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून मोठा दिलासा दिला आहे.

राज्यातील हजारो आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका तुटपुंजा मानधनावर काम करत आहेत. अशा आशासेविका आणि अंगणवाडी सेविकांना वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून मोठा दिलासा दिला आहे. आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामधून वित्तमंत्र्यांनी आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली आहे.

आज अर्थसंकल्प सादर करताना वित्तमंत्र्यांनी ही घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, राज्यात सध्या सुमारे ८१ हजार आशा स्वयंसेविका तर साडेतीन हजार गटप्रवर्तक महिला कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकांचे सध्याचे मानधन हे ३ हजार ५०० रुपये आहे. तर गटप्रवर्तकांचे सध्याचे मानधन हे ४ हजार ७०० रुपये एवढे आहे. या मानधनात १५०० रुपये एवढी वाढ करण्यात येत आहे.

तसेच अंगणवाडी सेविकांचं मानधन हे ८ हजार ३२५ वरून १० हजार रुपये एवढे करण्यात येत आहे. तर मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५ हजार ९७५ वरून ७ हजार २०० रुपये करण्यात येत आहे. तर अंगणवाडी मदतनिसांचे मानधन हे ४४२५ वरून ५५०० रुपये करण्यात आले आहे, अशी माहिती वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली.

तसेच  अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची २० हजार पदे भरणार असल्याची घोषणाही देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याबरोबरच अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली निर्माण केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्याबरोबरच अर्थसंकल्पामधून देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी इतरही काही घोषणा केल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार असल्याची घोषणाही अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. 

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2023Maharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस