शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

Maharashtra Budget 2023 | "अठरापगड जातींना आणि बारा बलुतेदारांना न्याय देणारा अर्थसंकल्प"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 7:39 PM

भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

Maharashtra Budget 2023 | छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभारापासून प्रेरणा घेत अठरापगड जातींना आणि बारा बलुतेदारांना न्याय देणारा राज्याचा उत्कृष्ट अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मांडला. एकविसाव्या शतकातील महाराष्ट्र कोणत्या दिशेने जावा हे स्पष्ट करणारा आणि राज्याला नवी उभारी देणारा हा अर्थसंकल्प आहे. त्याबद्दल आपण मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

"या अर्थसंकल्पाने राज्याचा इतिहास, संस्कृती आणि विरासत जपतानाच संपूर्ण महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेऊन समाजाच्या सर्व घटकांना मदत केली आहे. संपूर्ण राज्यातून या अर्थसंकल्पाचे स्वागत होत आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केली आहे. महिलांसाठी महत्त्वाच्या योजना आहेत. संजय गांधी आणि श्रावण बाळ या योजनांमधून मिळणाऱ्या रकमेत वाढ करून वंचित वर्गाला मदत केली आहे. त्याचबरोबर राज्याचा जीडीपी वाढवून आपले राज्य देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य होण्यासाठी अर्थसंकल्पात उपाययोजना केली आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे आपण या अर्थसंकल्पाचे स्वागत करतो," असे ते म्हणाले.

"उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पासाठी जनतेच्या सूचना मागविल्या होत्या व त्यांच्या आवाहनाला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला आणि चाळीस हजार सूचना आल्या. या सूचनांचा संवेदनशीलतेने विचार करून त्यातील काहींचा अर्थसंकल्पात समावेश केला. अर्थसंकल्पात जनभागिदारीचा हा अनोखा उपक्रम स्वागतार्ह आहे. यामुळे हा अर्थसंकल्प सामान्य जनतेचा होण्यास मदत झाली," असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2023Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस