Maharashtra Budget 2024: राज्य अर्थसंकल्पातील २० महत्त्वाच्या घोषणा, वाचा एकाच क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 03:51 PM2024-06-28T15:51:36+5:302024-06-28T15:53:16+5:30

अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, वारकरी आणि महिलांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची घोषणा करण्यात आली आहे. 

Maharashtra Budget 2024: 20 Important State Budget Announcements by Ajit Pawar, Read in One Click | Maharashtra Budget 2024: राज्य अर्थसंकल्पातील २० महत्त्वाच्या घोषणा, वाचा एकाच क्लिकवर

Maharashtra Budget 2024: राज्य अर्थसंकल्पातील २० महत्त्वाच्या घोषणा, वाचा एकाच क्लिकवर

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्याच्या एकूण खर्चापैकी ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प आज विधानसभेत मांडण्यात आला. या अर्थसंकल्पातून सरकारने महिला, शेतकरी, वारकरी यांच्यासह विविध घटकांसाठी मोठ्या प्रमाणात योजनांची घोषणा केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाचीही स्थापना करण्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

राज्य अर्थसंकल्पातील २० महत्त्वाच्या घोषणा

वारकऱ्यांसाठी -

  1. महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’ घोषित
  2. वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी २० हजार रुपयांचा निधी, ‘निर्मल वारी’साठी ३६ कोटींचा निधी
  3. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू-आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी  मार्गावरील  सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी

 

महिलांसाठी

  1. २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’
  2. महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी ‘पिंक ई-रिक्षा’ योजना, पिंक ई रिक्षा - १७ शहरांतल्या १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य - ८० कोटी रुपयांचा निधी 
  3. ५२ लाख कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर  मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना’ 
  4. लखपती दिदी- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ७ लाख नवीन गटांची स्थापना-बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत १५ हजार रुपयांवरुन ३० हजार रुपये वाढ 
  5. महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना’, लघुउद्योजक महिलांना १५ लाख कर्जापर्यंतच्या व्याजाचा परतावा योजना
  6. अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित ८ लाख रूपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के प्रतिपूर्ती 

 

शेतकऱ्यांसाठी - 

  1. ‘मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनें’तर्गत राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना  मोफत वीजपुरवठा, दुधउत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान
  2. ‘गाव तेथे गोदाम’ या नवीन योजनेत पहिल्या टप्प्यात १०० नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती 
  3. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सन २०२३-२४ मध्ये ३५० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे ८५१ कोटी ६६ लाख रुपये अनुदान
  4. मागेल त्याला सौरउर्जा पंप, शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जीकरण करण्याचा १५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प -एकूण ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौरउर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार
  5. दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरीता प्रतिलिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान देण्याची योजना जुलै, २०२४ पासून पुढे चालू ठेवण्यात येणार


युवकांसाठी - 

  1. राज्यातील दहा लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि दरमहा दहा हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन देणाऱ्या ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजने’ची घोषणा, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
  2. ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी ८२ शासकीय वसतीगृहे स्थापन करण्यास मंजूरी 
  3. नवी मुंबईत महापे येथे जेम्स अॅन्ड ज्वेलरी पार्कची निर्मिती, सिंधुदुर्ग येथे ६६ कोटींच्या आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्कुबा डायव्हिंग केंद्राची निर्मिती, ८०० स्थानिकांना रोजगार 
  4. खाजगी गुंतवणूक वाढविण्यासाठी लघु-वस्त्रोद्योग संकुले तसेच टेक्निकल टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार
  5. शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी ५० हजार युवकांना कार्यप्रशिक्षण
  6. राज्यभरात पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर समान करण्याची तरतूद, व्यवसाय कर, मुद्रांक शुल्काबाबतही दिलासादायक तरतूद
     

Web Title: Maharashtra Budget 2024: 20 Important State Budget Announcements by Ajit Pawar, Read in One Click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.