श्वेताली ठाकरेअर्थतज्ज्ञ, चार्टर्ड अकाउंटंट
गरीब
अर्थसंकल्पातून मांडलेला GYAN हा धोरणात्मक उपक्रम उपेक्षित, वंचित समुदायांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या शाश्वत आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक-आर्थिक विषमता कमी करण्यासाठी आखण्यात आला आहे. राज्य प्रगती करीत असताना, भारतातील सर्वसमावेशक विकास आणि आर्थिक लवचीकपणासाठी एक बेंचमार्क सेट करण्याचे उद्दिष्ट यामागे आहे.
युवायुवा वर्ग हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यांच्यासाठी छात्रवृत्ती (स्टायपेंड), व्यावसायिक प्रशिक्षण, नवीन शैक्षणिक संस्था आणि वसतिगृहांची स्थापना करून त्यांच्यातील कौशल्यविकासावर भर देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमाची रचना तरुणांना राज्याच्या आर्थिक परिदृश्यात नेतृत्वासाठी आणि नवनिर्मितीसाठी सक्षम बनविण्यासाठीही केली आहे.
शेतीमहाराष्ट्राच्या सकल राज्य देशांतर्गत उत्पादनात (GSDP) १३.२ % योगदान शेतीचे आहे. महाराष्ट्रातील ५१ % लोकसंख्या शेतीत गुंतलेली आहे. परंतु, आजघडीला हे क्षेत्र पर्यावरण आणि मानवनिर्मित घटकांमुळे वाढलेल्या आव्हानांना तोंड देत आहे. अर्थसंकल्पात कर्जमाफी, वीज सवलती आणि सौर अवलंब, विविध अनुदाने, आरोग्य/शेती विम्यासाठी प्रोत्साहने यासह कृषी साहाय्यासाठी भरीव संसाधनांची तरतूद केली आहे. ‘जलयुक्त शिवार’सारख्या उपक्रमांतर्गत पायाभूत सुविधांमधील सुधारणांचा उद्देश नैसर्गिक संकटांविरुद्ध प्रतिकारशक्ती तसेच कृषी उत्पादकता वाढविणे हा आहे.
नारीमहाराष्ट्राचा महिला कामगार सहभाग दर ३७.७ % आहे, जो राष्ट्रीय सरासरी २८.७ % पेक्षा जास्त आहे. परंतु, पुरुष दर ७३ % च्या तुलनेत मागे आहे. महिलांच्या सहभागाला चालना देण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी, राज्याने शैक्षणिक शुल्क माफी आणि सार्वजनिक वाहतूक भाड्यात ५०% कपात, गुलाबी ई-रिक्षा, स्टायपेंड, प्रशिक्षण, १५०० रुपयांचा मासिक भत्ता यासारख्या प्रगतिशील उपायांची अंमलबजावणी केली आहे. शिक्षण आणि रोजगाराच्या संधींचा पाठपुरावा करणाऱ्या महिलांसाठी यातून सुलभता आणि परवडणारी क्षमता उपलब्ध करूनदिली आहे.
खर्चात बचत करून उत्पन्न वाढविण्यावर भर
सामाजिक गुंतवणुकीच्या क्षेत्रात, महाराष्ट्रात जनसामान्यांच्या खर्चात बचत करणे हे तेथील लोकांसाठी स्वतःचे उत्पन्न वाढविण्यासारखे आहे.यादृष्टीने उपेक्षित समुदायाच्या स्वयं-विकासाकडे लक्ष केंद्रित करून GYAN सारख्या उपक्रमातून परिवर्तन घडवित राज्यातील सर्व नागरिकांचे समृद्ध भविष्य निर्माण करण्याचा उद्देश दिसून येतो.