शहरं
Join us  
Trending Stories
1
Hathras Stampede : हाथरसचं सत्संग मैदान बनलं 'स्मशानभूमी'; चेंगराचेंगरीतील ११६ जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
2
मविआच्या ३ उमेदवारांमुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस; माघार की घोडेबाजार? फैसला शुक्रवारी
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य : ३ जुलै २०२४; आजचा दिवस नोकरदारांना लाभदायक, घरात आनंदाचे वातावरण
4
रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा खच, आक्रोश अन् किंकाळ्या...; मृतदेह पाहून शिपायाला हार्ट अटॅक
5
नीट प्रकरणात दोन्ही आरोपींना ५ दिवसांची CBI कोठडी; पालकांनाही आरोपी करण्याची मागणी
6
जुलैत पावसाची सेंच्युरी; सरासरीपेक्षा १०६ टक्के बरसण्याचा अंदाज
7
मराठा आरक्षणाविरोधी याचिकांमध्ये मागासवर्ग आयोग महत्त्वाचा प्रतिवादी
8
MSRDC चे प्रकल्प, कार्यालये सौरऊर्जेने उजळणार; संपूर्णपणे अक्षय्य ऊर्जेच्या वापराच्या दिशेने पाऊल
9
बाबूजी सामान्यांचा आवाज, विचारांची बांधील राहून पत्रकारितेची मूल्ये जपली -  विजय दर्डा
10
आधी हिजाबबंदी, आता जीन्स, टी-शर्टलाही मनाई; कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी नवा ड्रेसकोड
11
नौदल अधिकारी गुंतले मानवी तस्करीत; गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक माहिती
12
पासपोर्ट सेवा केंद्र भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई; दीड कोटीची रोकड, डायऱ्या दलालांकडून जप्त
13
दुधाची नाशवंतता संपली; मग हमीभाव का नाही?; दीर्घकालीन उपाय करण्याची आवश्यकता
14
जगातलं सर्वांत कमी उंचीचं जोडपं! लोकांच्या टोमण्यांचा सामना करावा लागला, पण आज..
15
भावना गवळी, कृपाल तुमानेंना विधानपरिषदेची उमेदवारी; शिंदे गटात नाराजी
16
...तर तो पक्ष लोकांचा पक्ष झाला पाहिजे; राहुल गांधी यांचा उदय, घसरण आणि पुन्हा उदय
17
उमेदवारच झाला संकट! बायडेन यांच्या सुमार कामगिरीमुळे पक्षात अंतर्गत वादविवादच सुरू
18
"सलग तिसऱ्यांदा १०० च्या आत, तिसरा पराभव, तरीही काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टिम...", मोदींचा खोचक टोला
19
"बाबूजी म्हणजे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील खणखणीत नाणे", देवेंद्र फडणवीसांकडून स्व. जवाहरलाल दर्डांना अभिवादन
20
“जयंत पाटील तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra Budget 2024: बळीराजाला खूश करण्यासाठी सरकारकडून घोषणांचा पाऊस, अर्थसंकल्पातून केल्या या तरतुदी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 4:21 PM

Maharashtra Budget 2024: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ग्रामीण भागातील जनता आणि शेतकऱ्यांची नाराजी महायुतीला भोवली होती. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामधून राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध घोषणांचा पाऊस पाडला आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला होता. विशेषकरून ग्रामीण भागातील जनता आणि शेतकऱ्यांची नाराजी महायुतीला भोवली होती. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामधून राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध घोषणांचा पाऊस पाडला आहे. वित्तमंत्री अजित पवार यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानभरपाईसाठी हजारो कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याबरोबरच पिकवीमा, कृषिपंपांची वीजबिल माफी, गाव तिथे गोदाम योजना, दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान, अशा घोषणा करण्यात आल्या आहेत.

आज अजित पवार यांनी सादर केलेल्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामधील शेतकऱ्यांसाठीच्या प्रमुख घोषणा पुढील प्रमाणे आहेत.  - नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या  नुकसानीपोटी जुलै, २०२२ पासून १५ हजार २४५ कोटी ७६ लाख रूपयांची मदत - नोव्हेंबर - डिसेंबर, २०२३ मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या २4 लाख ४७ हजार शेतकऱ्यांना २ हजार २५३ कोटी रुपयांची मदत- नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा दोनऐवजी तीन हेक्टर करुन राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने मदत - खरीप हंगाम २०२३ करिता ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ तर १ हजार २१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू -नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्‍यासाठी ई-पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू -‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ अंतर्गत एकूण ९२ लाख ४३ हजार शेतकरी कुटुंबांना ५ हजार ३१८ कोटी ४७ लाख रुपये अनुदान -‘एक रुपयात पीक विमा योजने’ अंतर्गत ५९ लाख ५७ हजार शेतकऱ्यांना ३ हजार ५०४कोटी ६६  लाख रुपये रक्कम अदा -‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने’ अंतर्गत २ हजार ६९४ शेतकरी कुटुंबांना ५२ कोटी ८२ लाख रुपयांचे अनुदान वाटप -‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’ अंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या १४ लाख ३३ हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून ५ हजार १९० कोटी रुपये अदा केले, उर्वरित रकमेचे वाटप त्वरीत -नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा ६ हजार कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा २१ जिल्ह्यांत राबविण्यात येणार - मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातंर्गत १ हजार ५६१ कोटी ६४ लाख  रुपये किमतीच्या ७६७ उपप्रकल्पांना मंजूरी- सुमारे ९ लाख शेतकऱ्यांना लाभ - विदर्भ आणि मराठवाडयातील १४  विपत्तीग्रस्त जिल्हयातील केशरी शिधापत्रिकाधारक ११ लाख ८५  हजार शेतकरी लाभार्थींना मे २०२४ अखेर ११३ कोटी ३६ लाख रुपये थेट रोख रक्कम अदा - राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्यपुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून गेल्या तीन वर्षात २ लाख १४ हजार शेती उपकरणांच्या खरेदीसाठी १ हजार २३९ कोटी रुपये अनुदान - ‘गाव तेथे गोदाम’ या नवीन योजनेत पहिल्या टप्प्यात १०० नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती - कापूस, सोयाबीन तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादकतेत वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना-सन २०२४-२५ मध्ये ३४१ कोटी रुपये निधी - आधारभूत किंमतीनुसार खरीप व रब्बी हंगामातील कडधान्य व तेलबियांच्या नाफेडमार्फत खरेदीसाठी १०० कोटी रुपयांचा फिरता निधी - खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य - कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सन २०२३-२४ मध्ये ३५० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे ८५१ कोटी ६६ लाख रुपये अनुदान- कांदा आणि कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी २०० कोटी रुपयांचा फिरता निधी - खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये ६ लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २०  हजार रुपयांप्रमाणे १ हजार ३५० कोटी रुपये प्रोत्साहन रक्कम प्रदान - नोंदणीकृत २ लाख ९३  हजार  दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपयांप्रमाणे २२३ कोटी ८३ लाख रुपये अनुदान वितरीत ,राहिलेले अनुदानही त्वरित वितरीत करणार - दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरीता प्रतिलिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान देण्याची योजना जुलै, २०२४ पासून पुढे चालू ठेवण्यात येणार- पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नव उद्योजक निर्माण करण्याकरीता नवीन ‘दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प’- शेळी-मेंढीपालन आणि कुक्कुटपालनाला प्रोत्साहन  देण्यासाठी दोन नवीन प्रकल्प - मत्स्यबाजार स्थापना तसेच मासळी विक्री सुविधांसाठी  ५०  कोटी रुपये निधी- अटल बांबू समृद्धी योजनेतून १० हजार हेक्टर खाजगी क्षेत्रावर बांबूची लागवड -प्रतिरोपासाठी १७५ रूपये अनुदान -राज्यातील पडीक जमीनीवर मोठया प्रमाणात बांबूची लागवड - नंदुरबार जिल्ह्यात १ लाख  २० हजार एकर क्षेत्रावर बांबूची लागवड - वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जिवीतहानी-  नुकसान भरपाईच्या रकमेत २० लाख रुपयांवरून २५ लाख रुपये,  कायमचे अपंगत्व आल्यास ५ लाख रुपयांवरून ७ लाख ५० हजार रुपये, गंभीर जखमी झाल्यास १ लाख २५ हजारावरून ५ लाख रुपये, किरकोळ जखमी झाल्यास २० हजार रुपयांवरून ५० हजार रुपये अशी वाढ , शेती पिकाच्या नुकसान भरपाईकरिता देय रकमेच्या कमाल मर्यादेतही २५ हजार रुपयांवरून ५० हजार रुपये वाढ     - सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहिम- १०८ प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता -दोन वर्षात ६१ प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित- सुमारे ३ लाख ६५ हजार हेक्टर सिंचन क्षमता- महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम- १५५ प्रकल्पांच्या कालवे वितरण प्रणालीची सुधारणा -येत्या तीन वर्षात त्यामुळे सुमारे ४  लाख २८ हजार हेक्टर वाढीव क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ - विविध अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, वितरण प्रणालीतील सुधारणांसाठी नाबार्डकडून १५  हजार कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे अर्थसहाय्य - म्हैसाळ जिल्हा सांगली येथे पथदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प - अंदाजित किंमत एक हजार ५९४ कोटी रुपये- सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ७५ हजार शेतकरी कुटुंबांना लाभ- स्वच्छ व हरित उर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी जनाई-शिरसाई, पुरंदर यासह सर्व शासकीय  उपसा जलसिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण - ४ हजार २०० कोटी रुपये खर्च- वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प- नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील ३ लाख ७१ हजार २७७ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ - कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळावी आणि अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागात वळविण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने तीन हजार २०० कोटी रुपये किंमतीचा महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम - जलयुक्त शिवार अभियान-२ अंतर्गत  मार्च २०२४ अखेर ४९ हजार ६५१ कामे पूर्ण - ६५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद - ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत एकूण ३३८ जलाशयातून ८३ लाख ३९ हजार ८१८ घनमीटर गाळ काढण्यात आला. ६ हजार शेतकऱ्यांना  लाभ. - मागेल त्याला सौरउर्जा पंप- शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जीकरण करण्याचा १५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प -एकूण ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौरउर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार.

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2024vidhan sabhaविधानसभाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार