मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. राज्याचे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. दरम्यान, आतापर्यंत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी आता केवळ 1 रुपयांत पीकविमा दिला जाणार आहे. याचबरोबर, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी 3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी आणखी काय घोषणा करण्यात आल्या आहेत? ते वाचा पुढील प्रमाणे...
महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा - आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्यांकडून- आता शेतकर्यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार हप्ता- शेतकर्यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा- 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार
महाराष्ट्रातील शेतकर्यांना कर्जमाफी योजनांचे लाभ - 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्यांना योजनेचे लाभ देणार- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले.- 12.84 लाख पात्र शेतकर्यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा.
महाराष्ट्रातील शेतकर्यांना कर्जमाफी योजनांचे लाभ - 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्यांना योजनेचे लाभ देणार- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले.- 12.84 लाख पात्र शेतकर्यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा.
महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी महाकृषिविकास अभियान - राज्यातील शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार- पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत- तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना- एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार- 5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार
‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा आता व्यापक विस्तार - मागेल त्याला शेततळे योजनेचा आता व्यापक विस्तार- आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण- मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर- या योजनेवर 1000 कोटी रुपये खर्च करणार
काजू बोंडूवर प्रक्रिया केंद्र, काजू फळ विकास योजना! - 200 कोटी रुपयांच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्ड- काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया काजू बोंडूला 7 पट भाव- उत्पन्नवाढीसाठी कोकणात काजू बोंडू प्रक्रिया केंद्र- कोकण, चंदगड तसेच आजरा (कोल्हापूर) येथे काजू फळ विकास योजना- 5 वर्षांसाठी 1325 कोटी रुपयांची तरतूद
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन- नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार- 3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार- 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करणार- डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीवाढ- 3 वर्षांत 1000 कोटी रुपये निधी
शेतकर्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोखीने आर्थिक मदत! - विदर्भ, मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत- अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट आधार बँक खात्यात- प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी 1800 रुपये देणार
शेतमाल विक्रीसाठी आलेल्याशेतकर्यांना निवारा-भोजन- कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणार्या शेतकर्यांना सुविधा- शेतकर्यांच्या मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन- जेवणासाठी शिवभोजन थाळीची उपलब्धता