शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

Maharashtra Budget Session 2022: 'आज बाळासाहेब असते तर एका मिनिटात…', नवाब मलिक प्रकरणावरुन फडणवीसांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 3:30 PM

Maharashtra Budget Session 2022 : 'नवाब मलिकांचे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे उघड झाले झाले, तरीदेखील ते अद्याप मंत्रीपदावर आहेत.'

मुंबई: आज राज्याच्या अर्थसंक्पीय अधिवेशनाला(Maharashtra Budget Session 2022) सुरुवात झाली आहे. आज पहिल्याच दिवशी भाजपने नवाब मलिक(Nawab Malik) प्रकरणावरुन सरकारला धारेवर धरले. मलिक यांना दिवसांपूर्वीच ईडी(ED)ने अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाने लावून धरली आहे. विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 

'मंत्र्याचे दाऊदशी संबंध'मीडियाशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिक प्रकरणावरुन सरकारवर निशाणा साधला. 'इतिहासात असे कधीच घडले नाही. मुंबईत बॉम्बस्फोट झाले, त्या स्फोटाचा आरोपी दाऊद याच्यासोबत व्यवहार केल्याचा आणि त्याची बहिण हसीना पारकरला पैसे दिल्याचा मंत्र्यावर आरोप आहे. त्यासाठी त्यांना अटकही झाली आहे, पण हा माणूस मंत्रीपदावर राहातो, हे नैतिकतेला धरून नाही', अशी टीका फडणवीसांनी केली.

'आज बाळासाहेब असते तर...'फडणवीस पुढे म्हणाले की, 'मुंबईचे अपराधी, ज्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट केला, अशा लोकांकडून फक्त जमीन घेतली असं नाही तर 55 लाख रुपये हसीना पारकरला दिले. हसीना पारकर ही दाऊदची बहीण आहे. त्याच्या बहिणीला पैसे देणं म्हणजे त्यानंतर झालेल्या बॉम्बस्फोटात जे लोक सामील आहेत, त्यांना मदत करण्यासारखेच आहे. आज हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते, तर एका मिनिटात त्यांची हकालपट्टी केली असती,' असंही फडणवीस म्हणाले.

'हे तर दाऊद शरण सरकार...''प्रकरण उघडकीस आल्यानंतर सरकार मंत्र्याच्या पाठिशी उभं राहात असेल, तर हे दाऊद शरण सरकार आहे असंच म्हणावं लागेल. संजय राठोड जेलमध्ये गेले नव्हते, तरीही तुम्ही नैतिकतेच्या आधारावर त्यांचा राजीनामा घेतला. आता नवाब मलिक जेलमध्ये असून त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. तरी त्यांना वाचवण्याचे काय कारण? कुणाच्या दबावाखाली नवाब मलिकांना वाचवलं जात आहे?' असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी विचारला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनUddhav Thackerayउद्धव ठाकरेnawab malikनवाब मलिक