शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

Maharashtra Budget Session 2022: सामाजिक महामंडळांना दिलासा, कृषिपंपधारकांसाठीही तरतूद; ६,२५० कोटींच्या पुरवणी मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 5:39 AM

Maharashtra Budget Session 2022: विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ६,२५० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ६,२५० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. त्यात कृषिपंपांसाठी ४९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विविध सामाजिक महामंडळांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

राज्य सरकारने सारथी संस्थेसाठी १०६ कोटी, तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी  १०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. तसेच महाज्योतीसाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत, तर वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत पुरवणी मागण्या सादर केल्या. पुरवणी मागणीतील दोन हजार ६९९ कोटींच्या मागण्या अनिवार्य खर्चाच्या आहेत, तर तीन हजार ४९० कोटींच्या मागण्या कार्यक्रमांतर्गत खर्चाच्या आहेत.

महापालिका क्षेत्रातील पायभूत सुविधांसाठी पुरवणी मागणीत  ६०० कोटी रुपये, नगरपालिकांना सहाय्यक अनुदानापोटी १३३ कोटी रुपयांची तरतूद आहे. निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना द्यायच्या निवृत्तिवेतनसाठी एक हजार ५०० कोटी, उद्योग विभागाच्या सामूहिक प्रोत्साहन योजनेसाठी ८७१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पुरवणी मागणीतील खातेनिहाय तरतूद

महिला आणि बालविकास: १२६ कोटी. सहकार आणि  पणन: ८२ कोटी. कृषी: ८१ कोटी.  जलसंपदा: ७५ कोटी. सामाजिक न्याय: ५३ कोटी. उद्योग, ऊर्जा, कामगार: २८४८ कोटी. वित्त आणि नियोजन: १७६३ कोटी. नगरविकास: ७३३ कोटी. महसूल आणि वने: १८१ कोटी. इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग : १६४ कोटी.

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेटBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन