शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

Maharashtra Budget Session : 1 एप्रिलला शिंदे-फडणवीस शॉक देणार, अर्थसंकल्पानंतर सांगतील; अजित पवारांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 3:57 PM

'अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला. अर्थसंकल्पात वास्तावाचं भान नाही, केवळ घोषणांचा सुकाळ.'

मुंबई - आज महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसह महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. दरम्यान, अर्थसंकल्पानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी या अर्थसंकल्पाला 'चुनावी जुमला' म्हटले.

अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला'चुनावी जुमला असतो ना...तसाच हा अर्थसंकल्प आहे. दूरदृष्टीचा अभाव अन् वास्तवाचे भान नसलेला अर्थसंकल्प आहे. स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ असलेला हा अर्थसंकल्प आहे. राज्याची काय परिस्थिती आहे, उत्पन्न आणि खर्च किती आहे, ते पाहायाल हवं होतं. आज संत तुकाराम महाराजांच्या देहूमध्ये भरीव मदत करतील, अशी अपेक्षा होती, पण झाली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सभागृहात घोषणा सुरू होत्या, पण पंतप्रधानांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन झालेल्या स्मारकाबद्दल काहीच घोषणा नाही. फक्त लोकांना बरं वाटण्यासाठी सरकारने घोषणा केल्या,' अशी टीका अजित पवारांनी केली. 

फक्त घोषणा देण्याचे काम केलेते पुढे म्हणतात, 'गेल्यावेळेस मी अर्थसंकल्प सादर केला होता, त्यात आम्ही पंचसूत्री कार्यक्रम आणला होता, तर यांनी पंचामृत आणला. मूळात अमृत कुणीच बिघतलं नाही. तशाच प्रकारे हे विकासाचे पंचामृत आहे, ते कधीच दिसणार नाही. जनतेला स्वप्नांच्या दुनियेत फिरवून आणण्याचा प्रयत्न झालाय. त्यांनी 2014 मध्ये केलेल्या घोषणांची आज काय अवस्था आहे? राज्यातील उद्योग इतर राज्यात जातायेत, निधी योग्यरित्या खर्च होत नाहीये. यांनी फक्त घोषणा देण्याचे काम केले आहे,' अशी टीकाही त्यांनी केली. 

1 एप्रिलला जनतेला झटका बसणार'अर्थसंकल्पात अनेक महामंडळाची नावे घेतली, पण त्यांना किती निधी देणार हे सांगितलं नाही. कुठल्याही बाबतीत ठोस किती निधी दिला, याबद्दल काहीच माहिती दिली गेली नाही. गेल्यावेळेस आमच्या अर्थसंकल्पात ज्या गोष्टी होत्या, त्यातील अनेक गोष्टी यांनी रिपीट केल्या आहेत. 1 एप्रिलला जनतेला मोठा झटका बसणार. 30-35 टक्के विज दरवाढ होणार. त्यांनी अर्थसंकल्पात सांगितलं नाही, पण नंतर सांगतील. शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करण्यापेक्षा त्यांच्या पिकांना योग्य भाव द्या. महिलांबाबात मोठी घोषणा होईल अशी अपेक्षा होती, पण घोषणा झाली नाही. फक्त भरिव तरतूद करणार असं म्हणतात, पण भरिव म्हणजे किती करणार स्पष्ट करा,' असंही अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण