शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

Maharashtra Budget Session 2023 : इलेक्शन बजेट की दूरगामी योजना?, अर्थमंत्री फडणवीस यांच्या पोतडीत काय असेल? 

By यदू जोशी | Published: March 07, 2023 6:17 AM

९ मार्चला सादर करणार अर्थसंकल्प  

यदु जोशी मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदाच राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्च रोजी सादर करणार आहेत.  ते कोणत्या नवीन घोषणा करतात याबाबत कमालीची उत्सुकता असेल. 

नगरसेवक, महापौर असताना आणि नंतर आमदार झाल्यानंतरही नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करण्यात फडणवीस यांची नेहमीच महत्त्वाची भूमिका राहिली. अगदी अलीकडे निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुंबईत अशाच पद्धतीने फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे विश्लेषण केले होते.  आघाडी सरकार आणि महाविकास आघाडी सरकार असताना अर्थसंकल्पाची चिरफाड करणारी फडणवीस यांची भाषणे नेहमीच गाजली.आता राज्याच्या तिजोरीच्या चाव्या स्वतःकडे असताना ते सामान्यांना कुठला दिलासा देणार याबाबतही उत्सुकता असेल.  अर्थसंकल्पाला लोकाभिमुख चेहरा देण्याच्या उद्देशाने फडणवीस यांनी राज्यातील जनतेच्या सूचना मागविल्या होत्या. योग्य सूचनांचा अर्थसंकल्पात समावेश केला जाणार आहे.

घोषणांची फटकेबाजी 

  • पुढील वर्षीच्या एप्रिलमध्ये लोकसभेची आणि त्यानंतर सहा महिन्यांनी विधानसभा निवडणूक होणार आहे. 
  • या पार्श्वभूमीवर आपल्याला ट्वेंटी-ट्वेंटीची मॅच खेळावी लागेल, असे फडणवीस भाजपच्या कार्यकर्त्यांना उद्देशून नेहमीच सांगतात. 
  • वित्तमंत्री म्हणूनदेखील ते अशाच पद्धतीने घोषणांची फटकेबाजी करतील, अशी शक्यता आहे.  

याचाही असू शकतो बजेटमध्ये समावेश 

  • भाजपची व्होट बँक असलेले ओबीसी, बारा बलुतेदार यांच्या कल्याणाच्या विशेष योजना अर्थसंकल्पात असण्याची शक्यता आहे. 
  • जुनी पेन्शन योजना लागू करण्याची राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची  मागणी आहे. त्यासाठी हे कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात काही ते सूतोवाच करतात काय, याकडेही लक्ष असेल.
  • चार वर्षात राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट शिंदे - फडणवीस सरकारने निश्चित केले आहे. यासाठीच्या उपाययोजनांचा समावेश अर्थसंकल्पात असेल, असाही होरा आहे. 
  • आगामी निवडणुकीत भाजपकडून हिंदू अजेंडा राबविला जाईल असे म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर धार्मिक, ऐतिहासिक स्थळांच्या विकासासह  अन्य काही घोषणा असतील.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन