शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा
4
Ratan Tata's Will : वारसदार ठरला! कोणाला मिळणार रतन टाटांची १० हजार कोटींची संपत्ती?
5
आदित्य ठाकरेंच्या वरळीत राज ठाकरेंनी घातलं लक्ष; संदीप देशपांडेंना खास 'मेसेज'
6
मोगँबोच्या नातवाला पाहिलंत का? दिसायला इतका देखणा की स्टारकिडला देतोय टक्कर
7
किंग कोहली फुलटॉस बॉलवर फसला; Mitchell Santner नं उडवला त्रिफळा (VIDEO)
8
भाजपाला रामराम करत संजयकाका पाटील अजित पवार गटात; कवठेमहांकाळमधून उमेदवारी जाहीर
9
निवडणूक विशेष: तिकीट नाही? कर बंड, जा दुसऱ्या पक्षात! विधानसभेसाठी नाराजांचा नवा ट्रेंड
10
लेख: माझ्यावर हल्ला? -आता तुमची शंभरी भरली! आमचे सैनिक जळी-स्थळी दिसतील!
11
जागावाटपाचा संघर्ष मुख्यमंत्रिपदासाठी! निकालानंतर महत्त्वाच्या भूमिकेसाठी मित्रांशी संघर्ष
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
13
JioHotstar डोमेन खरेदी करून पठ्ठ्याने मागितले १ कोटी, आता Reliance नं काय केलं? काय आहे संपूर्ण प्रकरण?
14
“मला पाहताच राज ठाकरेंना अश्रू अनावर झाले होते”; मयुरेश वांजेळेंनी सांगितली भावूक आठवण
15
कधी अन् कुठं पाहता येईल IND-A vs AFG-A Semi-Final 2 ची लढत? जाणून घ्या सविस्तर
16
बारामतीत युगेंद्र पवारांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी, तर दादा...; अजित पवार गटानं डिवचलं
17
झिशान सिद्दीकींना राष्ट्रवादीकडून उमेदवारी; नवाब मलिकांना संधी नाही? अजित पवार म्हणाले...
18
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
20
Share Market Opening : आधी किरकोळ तेजी, मग घसरण; मोठ्या घसरणीसह उघडले 'हे' शेअर्स

Maharashtra Budget Session 2023 : राज्याचा विकास दर मंदावला; उद्योग जगतावर असेल मदार; आर्थिक पाहणीने वाढविली सरकारची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 5:36 AM

कृषी क्षेत्र माघारले : उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री देवेद्र फडणवीस यांनी मांडला अहवाल.

मुंबइ : राज्याचे आर्थिक चित्र ऑल इज वेल नसून आव्हानांचा डोंगर उभे असल्याचे चित्र आर्थिक पाहणी अहवालात समोर आले असतानाच उद्योग क्षेत्राने भरारी घेतल्याचे आशादायी चित्रदेखील आहे.  गेल्यावर्षी ठेवलेले १२.१ टक्के आर्थिक विकासाचे उद्दीष्ट साध्य करण्यात अपयश आले असून हा दर ९.१ टक्क्यावर आला आहे आणि २०२२-२३ मध्ये तो केवळ ६.८ टक्के इतकाच असेल असा अंदाज अहवालात व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री देवेद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत हा अहवाल मांडला. देशाच्या वित्तमंत्री निर्मला सितारामन यांनी ३१ जानेवारी रोजी लोकसभेत आर्थिक पाहणी अहवाल मांडताना देशाचा आर्थिक विकास दर सात टक्के राहील असे म्हटले होते. त्यापेक्षा ०.२ टक्के कमी म्हणजे ६.८ टक्के विकास दराने महाराष्ट्राची अर्थवाढ होइल असे राज्याच्या आर्थिक पाहणीत स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध दूर झाल्यानंतर  राज्याच्या  अर्थव्यवस्थेने गती घेणे अपेक्षित होते. मात्र, अजूनही अर्थव्यवस्थेला म्हणावी तशी चालना मिळाली नसल्याचे अहवालातून दिसते. 

कापूस, ऊस उत्पादनात वाढ, कडधान्यात घट 

  • २०२२-२३ च्या खरीप हंगामात १५७.९७ लाख हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी झाली. 
  • गेल्यावर्षीच्या तुलनेत तृणधान्ये तेलबिया कापूस व ऊस उत्पादनात अनुक्रमे १० टक्के १९, ५ व ४ टक्के वाढ अपेक्षित आहे. 
  • मात्र, तेलबियांच्या उत्पादनात तब्बल ३७ टक्क्यांची घट होणार असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे.
  • २०२२-२३ च्या रब्बी हंगामामध्ये ५७.७४ लाख हेक्टर क्षेत्रांवर पेरणी पूर्ण करण्यात आली. 
  • मागील वर्षाच्या तुलनेत कडधान्याच्या उत्पादनात ३४% वाढ अपेक्षित असून तृणधान्ये व तेलबियांच्या उत्पादनात प्रत्येकी १३ टक्के घट अपेक्षित आहे. 

राज्यातील दरडोई उत्पन्न ₹२,४२,२४७ २०२२-२३ । अपेक्षित ₹२,१५,२३३ २०२१-२२ ₹१,९३,००० २०२०-२१ ₹१,९६,००० २०१९-२०

स्थूल राज्य उत्पन्न३५,२७,०८४ कोटी रूपये (अर्थसंकल्पातील अंदाज)२१,६५,५५८ कोटी रुपये (वास्तविक)१४% एवढा वाटा देशाच्या स्थूल उत्पन्नात महाराष्ट्राचा असल्याचे अहवालात म्हटले आहे.

दरडोई उत्पन्नाबाबत अजूनही कर्नाटक, तेलंगणा, हरयाणा आणि तामिळनाडू ही राज्ये पुढे आहेत.राज्याचे २७,०१४ रुपयांनी दरडोई उत्पन्न वाढेल, अशी अपेक्षा आहे.

काय होणार बदल?

  • २०२२-२३ - उद्योग क्षेत्रात ६.१ तर सेवा क्षेत्रात ६.४% वाढ अपेक्षित आहे. 
  • २०२१-२२ - उद्योग क्षेत्राची वाढ ११.९% अपेक्षित केलेली असताना प्रत्यक्षात ३.८% इतकीच वाढ झाल्याचे वास्तव अहवालाने समोर आणले आहे. 
  • १३.५% इतकी सेवाक्षेत्राची वाढ गेल्यावर्षी अपेक्षित केली असताना प्रत्यक्षात १०.६ टक्के इतकीच वाढ झाली होती. २०२२-२३ मध्ये ती केवळ ६.४% इतकीच अपेक्षित आहे. 

राजकोषीय तुटीची चिंताराजकोषीय तूट ही नेहमीच सकल उत्पन्नाच्या ३ टक्क्यांपर्यंत राहत आली आहे. असे असले तरी २०२२-२३ मध्ये ती ३.५ टक्के इतकी दाखविली आहे. येत्या तीन वर्षांत ती ३ टक्क्यांवर आणण्याचा मानसही व्यक्त करण्यात आला आहे.सन  २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार  राज्याची महसुली जमा ४ लाख ३ हजार ४२७ कोटी तर महसुली खर्च ४ लाख २७ हजार ७८० कोटी अपेक्षित असून नोव्हेंबर २०२२ पर्यंत प्रत्यक्ष महसुली खर्च अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ५०. ८ टक्के तर विकासावरील महसुली खर्च अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ४७.६ टक्के इतका होता.

दुपारी २ वाजता अर्थसंकल्प   अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा सन २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवारी दुपारी २ वाजता अर्थसंकल्प मांडणार आहेत. शिंदे सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन