मंत्रिमंडळ निर्णय: माजी खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरपेक्षा कमी जमीन; विद्यापीठाच्या नावात छत्रपती संभाजीनगर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 02:43 PM2023-10-10T14:43:49+5:302023-10-10T14:44:15+5:30

Maharashtra Cabinate Meeting today: गेल्या आठवड्यातच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार न आल्याने राज्यात खळबळ उडाली होती. यानंतर आज पुन्हा मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली.

Maharashtra Cabinate Meeting Decision: Land less than 1 acre to tenant farmers; Chhatrapati Sambhajinagar University name change | मंत्रिमंडळ निर्णय: माजी खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरपेक्षा कमी जमीन; विद्यापीठाच्या नावात छत्रपती संभाजीनगर

मंत्रिमंडळ निर्णय: माजी खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरपेक्षा कमी जमीन; विद्यापीठाच्या नावात छत्रपती संभाजीनगर

गेल्या आठवड्यातच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार न आल्याने राज्यात खळबळ उडाली होती. यानंतर आज पुन्हा मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सात महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. 

हे आहेत सात निर्णय...

  • राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना. मुलींना करणार लखपती. ( महिला आणि बालविकास)
  • सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण. मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार.  ( जलसंपदा विभाग)
  • सांगली, अहमदनगर जिल्ह्यात  जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालये (विधि व न्याय विभाग)
  • पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरापेक्षा कमी जमीन मिळणार. (महसूल विभाग)
  • फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार ( परिवहन विभाग) 
  • भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन ( महसूल व वन विभाग)
  • विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता ( उच्च व तंत्र शिक्षण)

Web Title: Maharashtra Cabinate Meeting Decision: Land less than 1 acre to tenant farmers; Chhatrapati Sambhajinagar University name change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.