राज्य मंत्रिमंडळाचा गेले ३८ दिवस रखडलेला विस्तार मंगळवारी सकाळी पार पडला. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आमदारांना मंत्रिमंपदाची शपथ दिली. सध्याच्या मंत्रिमंडळात कोणत्याही महिला आमदाराला संधी देण्यात आली नाही. विस्तारात त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्य ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराचे सर्व अपडेट्स असे... >> भंडारा जिल्ह्यातील बलात्काराच्या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. राज्यातली निम्मी लोकसंख्या-कोट्यवधी मुलीमहिला असुरक्षित आहेत. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिला आमदारांमध्ये 'महिला व बाल विकास मंत्री' म्हणून एकही महिला नेतृत्व मुख्यमंत्री महोदयांना सक्षम वाटलं नाही का? - शालिनी ठाकरे
>> भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. ते २००९ पासून आमदार आहेत. यापूर्वी त्यांनी बंदरे, माहित व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री अशी जबाबदारी पार पाडली आहे. नगरसेवक म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. >> प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. फडणवीस सरकारमध्ये त्यांनी जलसंधारण मंत्री म्हणून भूमिका बजावली. परंतु यांपूर्वीच्या सरकारमध्ये त्यांची मंत्रिपदाची संधी हुकली होती.>> उदय सामंत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. २००४ पासून ते आमदार आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीची सुरूवात केली. त्यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रिपद भूषवलं आहे.>> संदीपान भुमरे यांनी आज घेतली मंत्रिपदाची शपथ. १९९५ पासून सलग ते पाच वेळा आमदार झाले आहेत. त्यांनी यापूर्वी रोजगार हमी आणि फलसंवर्धन मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. >> सांगलीच्या मिरजेतील मोठं नाव. सुरेश खाडे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. सामाजिक न्यायमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती.>> संजय राठोड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. यापूर्वी त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावं लागला होता. एका प्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले होते. भाजपच्याच आरोपांमुळे राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता.>> दादा भुसे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. ते मालेगावचे आमदार आहेत. पहिल्यापासून एकनाथ शिंदेेंचे समर्थन अशी ओळख. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी कृषीमंत्रीपद भूषवलं होतं. २००४ पासून ते आमदार राहिले आहेत.>> शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. गेल्या सरकारमध्ये स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री होते. ते जळगावचे आमदार आहेत.>> गिरीश महाजन यांनी घेतली मंत्रिपदाची शपख. यापूर्वी युती सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. >> आज शपथ घेणाऱ्या सर्वांनाच कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती.>> विजयकुमार गावित यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. गावितांचं राज्यपालांकडून मराठीत अभिनंदन. >> भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
>> केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो. राज्यात मागे काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. येत्या काळात आम्ही पक्षानं दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडू. चांगली कामगिरी करू - राधाकृष्ण विखे पाटील
>> मुख्यमंत्र्यांसोबत आता बैठक आहे. त्यानंतर मंत्रिमंडळात कोणाला स्थान दिलं जाईल हे ठरणार आहे. मी मुख्यमंत्र्यांन भेटण्यासाठी आलो आहे. भेट घेतल्यानंतर कोणाची नावं आहेत हे सांगेन - उदय सामंत
>> मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी एकनाथ शिंदे गटातील सर्व आमदारांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्र्यांची नावे निश्चित केली जातील
>> राज्य मंत्रिमंडळाचा गेले ३८ दिवस रखडलेला विस्तार मंगळवारी सकाळी ११ ला राजभवनवर होणार आहे. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील.