शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राची मोहोर, सर्वाधिक 45 पुरस्कार पटकावून देशात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 8:21 PM

‘स्वच्छ सर्वेक्षण -2019’ मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक 45 पुरस्कार पटकावून देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे, तर स्वच्छ सर्वेक्षणात ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ चा  तिस-या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राला  मिळाला आहे.

नवी दिल्ली : ‘स्वच्छ सर्वेक्षण -2019’ मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक 45 पुरस्कार पटकावून देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे, तर स्वच्छ सर्वेक्षणात ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ चा  तिस-या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राला  मिळाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.येथील विज्ञान भवनात एका शानदार समारंभात ‘स्वच्छ सर्व्हेक्षण-2019’ चे निकाल घोषित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सर्वोत्तम 10 पुरस्काराचे  वितरण यावेळी करण्यात आले. महाराष्ट्राला सर्वोत्तम (बेस्ट परफॉर्मिंग स्टेट) राज्याचा तिस-या क्रमांकाचा  पुरस्कार प्रदान करण्यात आला. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव  श्रीमती मनिषा म्हैसकर, महाराष्ट्र राज्य स्वच्छ भारत अभियानाच्या कार्यकारी संचालक सीमा ढमढेरे, राज्य अभियान संचालक जयंत दांडेगावकर व सुधाकर बोबडे यांनी राज्याच्या वतीने  हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला. या कार्यक्रमास  केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास राज्यमंत्री  हरदीपसिंग पुरी, केंद्रीय शहरी विकास विभागाचे सचिव दुर्गा प्रसाद  मिश्रा उपस्थित होते.  

राज्यातील 27 शहरांना कचरा मुक्त शहरांसाठी ‘थ्री स्टार’ दर्जास्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रातील 27 शहरे कचरा मुक्त ठरली आहेत. यामध्ये मूल, वैजापूर, वसई विरार, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, खोपोली, जुन्नर, लोणावळा, सासवड, भोर, इंदापूर, संगमनेर, परळी, पंढरपूर, मंगळवेढा, महाबळेश्वर, पाचगणी, क-हाड, रत्नागिरी, मलकापूर, पन्हाळा, वडगाव, कोल्हापूर, गडहिंग्लज, विटा, तासगाव, कोरेगाव  या शहरांचा समावेश आहे. कचरा मुक्तीसाठी या शहरांना ‘थ्री स्टार’ दर्जा देण्यात आला आहे. या सर्व शहरांना केंद्रीय शहर विकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  

कराड शहराला स्वच्छ शहराचा पुरस्कारस्वच्छ सर्वेक्षणातील पश्चिम विभागात एकूण 19 पुरस्कार देण्यात आले यापैकी 13 पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत. यामध्ये कराड, लोणावळा, मूल, उरण-इस्लामपूर, उमरेड, अंबाजोगाई, खोपोली, विटा, देवळाली-प्रवरा, इंदापूर, पोंभूर्णा , मौदा सीटी या शहरांचा समावेश आहे. एक लाख लोखसंख्या असलेल्या शहरामधून सातारा जिल्हयातील कराड, पुणे जिल्ह्यातील लोणावळा व चंद्रपूर जिल्ह्यातील मूल या शहरांना स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे.  50 हजार ते 1 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील उरण-इस्लामपूर, उमरेड, अंबाजोगाई व खोपोली या शहरांना स्वच्छ शहरांचा पुरस्कार मिळाला आहे.  25 ते 50 हजार लोकसंख्या असलेल्या वीटा, देवळाली-प्रवरा व इंदापूर या शहरांनाही स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे तर 25 हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या पोंभूर्णा, मौदा, मलकापूर या शहरांनाही पश्चिम विभागतून स्वच्छ शहरांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  

नागरिक प्रतिसादामध्ये नवी मुंबईला पुरस्कार10 लाखा पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या देशातील शहरांमध्ये नवी मुंबई शहराला स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांच्या उत्त्म प्रतिसादाबद्दल पुरस्कृत करण्यात आले. 3 ते 10 लोकसंख्या असलेल्या शहरांमधून नागरिक प्रतिसादासाठी चंद्रपूर शहराला गौरविण्यात आले, तर घन कचरा व्यवस्थापनात केलेल्या उल्लेखनीय कार्यायाठी  लातूर शहराला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार देण्यात आला.

पन्हाळा स्वच्छ सर्वेक्षणात देशात 17 व्या स्थानीस्वच्छ सर्वेक्षणात नवसंकल्पनांचा प्रभावी वापर केल्याबद्दल राजधानी शहरांसाठी असलेला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार बृन्हमुंबईला शहराला देण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा या शहराला देशातील 1 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या क्रमवारीत 17 वा क्रमांक मिळाला आहे. देशातील पाच शहरांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यामध्ये राजकोट, भिलाई नगर, विजयवाडा व गाजियाबाद या शहरांचा समावेश आहे. अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डास उत्तम स्वच्छ कॅन्टोनमेंट पुरस्कार देण्यात आला आहे.  

स्वच्छ रॅकिंगमध्ये पहिल्या शंभरात राज्यातील 24 शहरेकेंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने देशातील 423 शहरांची रॅकिंग जाहीर केली आहे. यामध्ये पहिल्या 100 शहरांत महाराष्ट्रातील 24 शहरांचा समावेश आहे. या शहरामध्ये नवी मुंबई (7), कोल्हापूर (16), मीरा-भाईंदर (27), चंद्रपूर (29), वर्धा (34), वसई-विरार (36), पुणे (37), लातूर (38), सातारा (45), पिंपरी-चिंचवड(52), उदगीर (53), सेालापूर (54), बार्शी (55), ठाणे (57), नागपूर (58), नांदेड-वाघाळा (60), नाशिक (67), अमरावती (74), जळगाव (76), कल्याण-डोबिंवली (77), पनवेल (86), अचलपूर (89),बीड (94) व यवतमाळ (96) या शहरांचा समावेश आहे.

घन कचरा व्यवस्थापनात राज्यातील चार शहरेघन कचरा व्यवस्थापनासाठी महाराष्ट्रातील चार शहरांना स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये लातूर, खोपोली, इंदापूर व मलकापूर या शहरांचा समावेश आहे.  स्वच्छतेबाबत नागरिकांचा प्रतिसाद मिळविण्यात प्रभावी कार्य केल्याबद्दल महाराष्ट्रातील नवी मुंबई, चंद्रपूर, उमरेड व पोंभूर्णा या शहरांना स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार प्रदान करण्यात आला.  

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMaharashtraमहाराष्ट्र