गुलाबी थंडीची चाहून न देताच हिवाळा कधी संपला हे आजही अनेकांना कळलेले नाही. चार महिन्यांच्या काळात महिनाभरही थंडी अनुभवता आलेली नाही. असे असताना आता होळीची चाहून लागली आहे. सूर्यदेव आग ओकू लागला असून निम्म्या महाराष्ट्रात उकाड्याला सुरुवात होणार आहे.
येत्या 3, 4 दिवसांत उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांत उत्तरेकडून कमी पातळीचे कोरडे आणि उष्ण वारे येण्याची शक्यता आहे. यामुळे कोकणासह महाराष्ट्राच्या उत्तर भागात दिवसाचे तापमान वाढणार आहे.
यंदा पावसानेही चांगल्या प्रमाणात हजेरी लावलेली नाही. यानंतर हिवाळ्यानेही तीन महिने उन्हाळ्यातच घालवले आहेत. यातच आता उन्हाळा सुरु होणार असल्याने खरा उन्हाळा म्हणजेच मार्च, एप्रिल आणि मे किती ताप देणार याबाबत थोरामोठ्यांमध्ये चर्चा रंगल्या आहेत. यामुळे यंदा कडक उन्हाळ्यासाठी तयार रहावे लागणार आहे.