शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

Maharashtra CM: माँसाहेब आणि बाळासाहेब आज तुम्ही हवे होतात; सुप्रिया सुळेंचं भावनिक ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 12:44 PM

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे.

मुंबई- महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापन केलेल्या महाविकास आघाडीचे नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शिवसेनेबरोबर राष्ट्रवादीचे मंत्रिसुद्धा शपथ घेणार असून, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी भावनिक ट्विट केलं आहे. माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब...! आज तुमची खूप आठवण येतेय. हे सर्व पहायला तुम्ही दोघे असायला हवे होतात. तुम्हा दोघांनी मला मुलीपेक्षाही जास्त प्रेम दिले. तुम्ही माझ्या आयुष्यात स्पेशल होता, आहात आणि राहाल, अशी भावनिक प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.तत्पूर्वीच राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंनीही या आघाडी सरकारसंदर्भात ट्विट करत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या होत्या. ट्विट करत त्या म्हणाल्या होत्या, आजचा सूर्योदय एका नवा इतिहास रचतोय. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यात येत आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. देशात महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतिपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करू, असंही त्या म्हणाल्या आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यातील 400 शेतकऱ्यांना विशेष निमंत्रित केले आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनाही आमंत्रित करण्यात आल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे सांगली जिल्ह्याच्या दौ-यावर असताना एका शेतक-याने मला तुमच्या शपथविधीला बोलवा, अशी विनंती केली होती. त्या शेतक-यास आवर्जून निमंत्रण पाठवले आहे. त्यामुळे हा शपथविधी सोहळा ऐतिहासिक बनण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना