Maharashtra CM : मी पुन्हा येईन बोलण्यापेक्षा मी जाणारच नाही असे बोला; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 01:18 PM2019-11-23T13:18:28+5:302019-11-23T13:31:39+5:30
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी सोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार आणि भाजपावर टीका केली.
मुंबई : अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. खंजीर खुपसणाऱ्यांचे शिवरायांनी काय केले हे सर्वांना माहिती आहे, असा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांच्या बंडखोरीवर दिला आहे. तसेच शरद पवार यांनीही गर्भित इशारा दिला आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी सोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार आणि भाजपावर टीका केली. देशामध्ये लोकशाहीच्या नावाखाली जो काही खेळ चाललेला आहे, हा खेळ संपूर्ण देशाला लाजिरवाणा आहे. हा सगळा खेळ खंडोबा बघितल्यानंतर मला असं वाटतं की आता निवडणुका घोषित न करता मी पुन्हा येईन बोलण्यापेक्षा मी जाणारच नाही असं बोलून फेविकॉल लाऊन माणसे बसली तर अधिक योग्य होईल, असा टोलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
Uddhav Thackeray: Let them try and break Shiv Sena MLAs , Maharashtra will not stay asleep pic.twitter.com/8I0wtGR8rO
— ANI (@ANI) November 23, 2019
शिवसेना जे काही करते ते उघडपणे करते आणि आमचं राजकारण टीव्हीवरच्या मालिका नसतात "रात्रीस खेळ चाले", आम्ही जे काही करतो ते दिवसा ढवळ्या करतो, असेही त्यांनी सांगितले. बिहार, हरियाणा, हा जनादेशाचा आदर म्हणजे एक गोष्ट नक्की झाली की आम्हाला विरोधी पक्ष नको, मित्रपक्ष नको, स्वतःच्या पक्षातील सदस्यही नको; मी आणि मी असेच ते वागत आहेत असे ठाकरे यांनी म्हटले.
NCP Chief Sharad Pawar: I don't know if he(Ajit Pawar) has done this fearing investigating agencies or not. As per my source, 10-11 MLAs were there in Raj Bhavan and out of those, 3 are already here sitting with me. pic.twitter.com/W8JgRlHx6Z
— ANI (@ANI) November 23, 2019
पाकवर सर्जिकलस्ट्राईक तसा हा फर्जिकल स्ट्राईक शिवरायांच्या महाराष्ट्रावर केला आहे. याचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.