हम सब एक है! शपथविधी सोहळ्यात दिसली NDA ची 'पॉवर'; PM मोदींच्या कृतीने जिंकलं मन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 19:31 IST2024-12-05T19:25:51+5:302024-12-05T19:31:58+5:30
Maharashtra CM Swearing Ceremony : या शपथविधीसाठी NDA तील सर्व घटकपक्षाचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी PM मोदींनी सर्व नेत्यांची भेट घेतली.

हम सब एक है! शपथविधी सोहळ्यात दिसली NDA ची 'पॉवर'; PM मोदींच्या कृतीने जिंकलं मन
Maharashtra CM Swearing Ceremony : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आज मोठा दिवस आहे. विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर आज(दि.5) अखेर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर, शिवसेना(शिंदे गट) प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस(अप) प्रमुख अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
'मी पुन्हा येईन' ही घोषणा रोज व्हायला हवी, कारण...; अमृता फडणवीसांची शपथविधीनंतर प्रतिक्रिया
मुंबईतील आझाद मैदानावर पार पडलेल्या या भव्य-दिव्य शपथविधी सोहळ्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसह अनेक केंद्रीय मंत्री आणि 22 राज्यांचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला NDA तील प्रमुख घटकपक्ष असलेल्या JDU चे प्रमख नितीश कुमार, TDP प्रमुख चंद्राबाबू नायडू, LJP प्रमुख चिराग पासवान, जनसेनेचे पवन कल्याण अन् कुमारस्वामींसह अनेकांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.
#WATCH | Mumbai | PM Modi meets Chief Ministers of NDA-ruled states at the oath ceremony of Maharashtra government
— ANI (@ANI) December 5, 2024
(Source: DD News) pic.twitter.com/zdwo3rPmnK
मंचावर दिसील NDA ची पॉवर
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंचावर येताच या सर्व नेत्यांची भेट घेतली. यामध्ये प्रामुख्याने चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांवर सर्वांच्या नजरा होत्या. पीएम मोदींनी या दोघांची भेट घेत काही सेकंदाचा संवादही साधला. लोकसभा निवडणुकीपासून पीएम मोदी कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये या दोन्ही नेत्यांना जास्त महत्व आणि मान देताना दिसतात. याचे कारण म्हणजे, लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता आलेली नाही. या दोन्ही पक्षांच्या मदतीनेच केंद्रात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत.
शपथेआधी एकनाथ शिंदेंनी दोन गुरूंना केलं वंदन; मोदी-शाहांसह १३ कोटी जनतेचे मानले आभार
लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांकडून सातत्याने सरकार पडणार, नितीश कुमार आणि चंद्राबाबू पाठिंबा काढून घेणार, अशी टीका केली जाते. पण, आजच्या कार्यक्रमात या सर्वांनी एकत्र येत 'हम सब एक है', असे दाखवून दिले आहे. फक्त हाच कार्यक्रम नाही, तर चंद्राबाबू नायडूंच्या शपथविधी सोहळ्यातही पीएम मोदींनी हजेरी लावली होती. तिथेही NDA तील सर्व प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते. यावरुनच NDA मजबूत असल्याचे भाजपकडून सातत्याने सांगितले जात आहे.
महाराष्ट्राचा महायुतीचा ऐतिहासिक विजय
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते, तर 23 नोव्हेंबरला निकाल लागलाहोता. महायुतीने २८८ पैकी २३०+ जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. यामध्ये भाजप १३२+, शिवसेना शिंदेगट 58 आणि राष्ट्रवादी अजित पवार गाटाला ४१ जागा मिळाल्या. तर, महाविकास आघाडीला ५० चा आकडाही पार करता आला नाही. या निकालानंतर मुख्यमंत्री कोणा होणार, हा सर्वात मोठा प्रश्न राज्यापुढे होता. पण, आज अखेर महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळला आहे.