मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीच्या माध्यमातून अनेक विषयांवर भाष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवरून भाजपावर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीचे भवितव्य चांगले आहे. पंतप्रधान मोदी व सोनिया गांधी यांना लवकरच दिल्लीत जाऊन भेटू, शरद पवार हे सरकारचे मार्गदर्शक आहेत, ‘रिमोट कंट्रोल’ नाहीत, असा खुलासाही मुलाखतीच्या तिसऱ्या भागात मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. यातील तिसरा आणि शेवटचा भाग बुधवारी (5 फेब्रुवारी) प्रकाशित झाला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांना सरकारचा ‘रिमोट कंट्रोल’ दुसऱ्या कोणाकडे आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला त्याला त्यांनी उत्तर दिलं आहे. 'रिमोट कंट्रोल वगैरे असा काही प्रश्न नाहीये. आम्ही तीन वेगळे पक्ष आहोत. मी माझ्या पक्षाचा प्रमुख आहे. आणि हो, तुमच्या प्रश्नाचा रोख मला कळला… तुम्हाला शरद पवारांविषयी विचारायचं आहे का? तर शरद पवारसुद्धा रिमोट कंट्रोल म्हणून वागत नाहीत… त्यांच्या काही सूचना असतील तर त्या जरूर करतात' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन येणार की नाही?; उद्धव ठाकरे म्हणतात...
...अन् उद्धव ठाकरे कात्रीत सापडले; सांगितला युतीत ओढवलेला प्रसंग
संजय राऊत यांनी उद्धवजी… या सरकारला ‘बाप’ किती? असं विचारलं असता 'बाप हा एकच असतो…आईही एकच असते' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीच्या बरोबरीने महाराष्ट्राचं भवितव्यही उज्ज्वल असल्याचं ही त्यांनी सांगितलं. तसेच 'शरद पवार यांचा अनुभव दांडगा आहे. त्यांच्या अनुभवाने ते मला नक्कीच मार्गदर्शन करतात. समजा काही विषय असला तर मीही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतो. पण त्यांचंसुद्धा एक वैशिष्टय़ आहे… त्यांना एखादी गोष्ट नीट समजावून सांगितली तर एका क्षणात ते म्हणतात, ठीक आहे… तुमचं म्हणणं बरोबर आहे' असं देखील म्हटलं आहे.
'...तर असं हिंदुत्व स्वीकारायला तयार नाही'; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
मागल्या दाराने नव्हे, छप्पर फाडूनच आलोय; उद्धव ठाकरेंचे विरोधकांना प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे यांनी सीएए, एनआरसी हे कायदे महाराष्ट्रात लागू होऊ देणार नसल्याचे म्हटले होते. यावरून भाजपाने राज्य बरखास्त होण्याचा इशाराही दिला होता. मात्र, आज उद्धव ठाकरे यांनी सीएएचे समर्थन केले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी सीएए हा नागरिकत्व देणार कायदा असल्याचे सांगितले आहे. ‘सीएए’बाबत किती गैरसमज आहेत ते आधी दूर करायला हवेत. ‘सीएए’ हा देशातील कोणालाही बाहेर काढण्याचा कायदा नाहीय, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ठाकरे यांनी एनआरसी हा धोकादायक कायदा असल्याचे म्हटले आहे. यामध्ये मुसलमानच नाहीत तर 40 टक्के हिंदूही भरडले जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
...तर मी मुख्यमंत्री झालोच नसतो, उद्धव ठाकरेंचे विधान
आमची हातमिळवणी खुपते, पण पक्ष फोडून आलेले चालतात; भाजपाला उद्धव ठाकरेंचा टोला मी ‘एनआरसी’ला विरोध केला म्हणजे मी राष्ट्रद्रोही आणि तुम्ही पाठिंबा दिलात म्हणजे तुम्ही देशभक्त असं नाही. अरे बाबा, ते ‘एनआरसी’ आले की तुम्हालाही नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी त्या लायनीत उभं राहावं लागणार आहे. तुमचेही आईवडील किंवा कुटुंबीय असतील त्यांनासुद्धा हे भोगावं लागणार आहे, असा इशारा ठाकरे यांनी भाजपच्या नेते , कार्यकर्त्यांना दिला.यानंतर त्यांनी आदिवासींचा प्रश्न उपस्थित केला. आदिवासींचं काय होणार? जंगल-दऱयाखोऱ्यातले आदिवासी कोठून आणणार जन्माचे पुरावे? सांगा जरा. आदिवासींना हे कळेल तेव्हा आदिवासीही प्रचंड संख्येनं रस्त्यावर येतील. त्यांच्याकडे नागरिकत्वाचा दाखला मागितला तर हे होणारच आहे. हिंदूंनासुद्धा हे भोगावं लागणार आहे. या देशात बहुसंख्य हिंदू आहेत आणि एनआरसीचा सगळय़ात जास्त त्रास हिंदूंनाच होणार आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
निर्भयाच्या गुन्हेगारांना एकाचवेळी फासावर लकटवणार की वेगवेगळे? आज निर्णय
एनआरसीचा भाजपातील 'हिंदूनाही' फटका बसणार; उद्धव ठाकरेंचा इशारा
केंद्र सरकारकडून राज्याची आर्थिक कोंडी; उद्धव ठाकरेंचा आरोप
औरंगाबादेत हिंगणघाटची पुनरावृत्ती; घरात घुसण्यास विरोध केल्याने महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
Delhi Election 2020 : 'पंतप्रधान मोदी ताजमहालही विकतील', राहुल गांधीचं टीकास्त्र