शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
3
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
4
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
5
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
6
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
7
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
8
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
9
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
10
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
11
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
12
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
13
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
14
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
15
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
16
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
17
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
18
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

महाराष्ट्र काँग्रेसची जम्बो कार्यकारणी जाहीर; आता असतील 18 उपाध्यक्ष, 65 सरचिटणीस अन् 104 सचिव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 12:34 AM

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव, सचिन सावंत आणि पृथ्विराज चव्हाण यांना मिळाली महत्वाची जबाबदारी.

नवी दिल्ली/मुंबई - काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गुरुवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची (एमपीसीसी) पुनर्रचना केली. यात मोठ्या संख्येने उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाना पटोले यांनी फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर, आता या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आगामी महापालिका आणि स्थानिक पातळीवरील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या या जम्बो कार्यकरणीकडे पाहिले जात आहे. (Maharashtra Congress now has 18 VPs, 65 general secretaries, 104 secretaries and 6 spokespersons)

काँग्रेसच्या या जम्बो कार्यकरणीत सर्वच मोठ्या नेत्यांना खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता प्रदेश काँग्रेसच्या या कार्यकारिणीत तब्बल 18 उपाध्यक्ष 65 सरचिटणीस, 104 सचिव आणि 6 प्रवक्त्यांचा समावेश असणार आहे. या नव्या कार्यकारणीत काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांच्याकडे उपाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे. त्यांच्यासह एकूण 18 उपाध्यक्ष असतील. याच बरोबर वैद्यकीय उच्च शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे भाऊ आणि आमदार धीरज देशमुख, माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांचे पुत्र शैलेश चाकूरकर आणि काँग्रेसचे फायरब्रँड प्रवक्ते सचिन सावंत यांच्याकडे सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

राज्यात मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुनरुच्चार

पृथ्विराज चव्हाण डिसिप्लिनरी अॅक्शन कमिटीच्या अध्यक्षपदी -या नव्या कार्यकारिणीत डिसिप्लिनरी अॅक्शन कमिटीच्या (Disciplinary Action Committee) अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उल्लास दादा पवार, भालचंद्र मुणगेकर, मुझफ्फर हुसेन आणि हर्षवर्धन सपकाळ हे या समितीचे नवे सदस्य असतील.

सहा प्रवक्त्यांची नियुक्ती -महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या या नव्या कार्यकारिणीत सहा प्रवक्त्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यात, अनंत विठ्ठलराव गाडगीळ, अतुल लोंढे, राजू वाघमारे, सचिन सावंत, संजय लाखे पाटील आणि उत्कर्षा रुपवते यांचा समावेश असेल.

याच बरोबर, ठाणे ग्रामीण, रायगड, भिवंडी शहर, उल्हासनगर शहर, सोलापूर ग्रामीण, सांगली ग्रामीण, जळगाव शहर, पुणे शहर आदी 14 जिल्ह्यांच्या अध्यक्षांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रSachin sawantसचिन सावंतPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणSonia Gandhiसोनिया गांधी